अभिनेत्री अर्चना नेवरेकर आणि सख्यांनी साजरा केला पारंपरिक भोंडला ...
मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री व इतर क्षेत्रातील सख्यांनी मिळून साजरा केला पारंपरिक भोंडला . अभिनेत्री अर्चना नेवरेकर व लीना नांदगावकर यांनी मिळून या भोंडल्याची आयोजन केले . कोरोना काळात भेटीगाठी थांबल्या होत्या पण आता हळू हळू परिस्थती पूर्वपदावर येत आहे .
नवरात्रीचे औचित्य साधत या सख्यांनी भोंडला कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला . या कार्यक्रमाला अर्चना नेवरेकर, लीना नांदगावकर ,सुप्रिया पाठारे ,शिल्पा नवलकर ,नियती राजवाडे ,अदिती सारंगधर ,वनश्री पांडे ,
मानसी नाईक , मेघा धाडे , पल्लवी प्रधान ,सुलेखा तळवलकर ,रोहिणी निनावे , कांचन अधिकारी,नितु जोशी ,
डॉ पूर्णिमा म्हात्रे ,रेखा सहाय ,वनिता कुंभारे ,सोनल खानोलकर उपस्थित होते , या निमित्ताने नुकतेच लग्न झालेल्या अभिनेत्री मानसी नाईक खरेरा चे गोड कौतुक करून ओटी भरण्यात आली .अंधेरी पश्चिम मधील 'नैवेद्य' या महाराष्ट्रीयन रेस्टोरंट मध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला .