शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 ऑक्टोबर 2021 (12:47 IST)

बाळूमामांच्या नावानं चांगभलं मालिका एका नव्या अध्यायात दसऱ्या पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार

फोटो साभार -सोशल मीडिया 
संत बाळू मामाच्या नावानं चांगभलं ही मालिका कलर्स टीव्हीवर खूप गाजली आहे. संत बाळूमामांनी समाज प्रबोधन दिले आणि समाजासाठी समाजाच्या कल्याणासाठी मोठे कार्य केले.सध्या या मालिकेने घर घरात आपली चांगली ओळख निर्माण केली आहे. या मालिकेत बाळुमामाच्या बालरूपाचे वर्णन त्यांच्या बाललीलाने प्रेक्षकांचा मनात ठसा उमटवला आहे. बाळूमामांनी गोरगरिबांसाठी केलेले हितकार्य त्यांचे प्रपंच, केलेल्या त्यागाचा साक्षात्कार लोकांना झाला. आणि तो रसिक प्रेक्षकांना आवडला. आता या दसऱ्या पासून बाळूमामांच्या दैवीय सामर्थ्याचा नवा अध्याय येत्या 15 ऑक्टोबर म्हणजे दसऱ्या पासून सुरु होऊन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका सोमवार ते रविवार संध्याकाळी 7 :30 वाजता कलर्स वाहिनी वर येणार आहे. बाळूमामांच्या नावानं चांगभलं हा जयघोष सर्वत्र दुमदुलाला आणि त्यांच्या दैवीय सामर्थ्याची प्रचिती आपल्याला बघायला मिळाली. आता दसऱ्यापासून पुन्हा या मालिकेचे नवीन अध्याय सुरु होऊंन मालिका अजूनच रंजक होण्याचे सांगितले जात आहे. समाजातील जातीवाद भेदभावात बदल घडून आणला. त्यांचे प्रबोधन असे होते की त्यांनी सांगितले की उपाशी राहून अध्यात्म करायचे नाही.त्यांचे निसर्गाशी जवळचे नाते होते. मेंढरांसह फिरताना भक्तीचे बीज रोवले. त्यांचे मुक्या जीवांवर नितांत प्रेम होत. ते त्यांची काळजी घ्यायचे. 
 
यानिमित्ताने बोलताना मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक संतोष अयाचित म्हणाले, 'भक्तांच्या मनात वृद्ध बाळूमामांची प्रतिमा कोरलेली आहे! बाल,तरुण बाळू मामा प्रेक्षकांनी पाहिले आहेत आणि त्याला उदंड प्रतिसाद दिला आहे विजयादशमीच्या मुहूर्तावर वृद्ध बाळू मामाचं दर्शन प्रेक्षकांना होणार आहे. मामांच्या चरित्रात उत्तरार्ध तेवढाच व्यापक आणि सुंदर आहे.संत परंपरेत अहोरात्र कार्य करणाऱ्या मामाचं कार्य ह्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर येणार आहे.'