मंगळवार, 27 फेब्रुवारी 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : सोमवार, 11 ऑक्टोबर 2021 (12:58 IST)

मनोरंजन बातमी ! बिग बॉस मराठी च्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री द्वारे येणार नवा पाहुणा जाणून घ्या कोण आहे हा नवा पाहुणा ?

बिग बॉस मराठी शो ला दमदार सुरुवात झाली असून बिग बॉस मराठीच्या घरात वेगवेगळ्या क्षेत्रातील नामांकित लोक एकत्र आले आहे.बिग बॉसचे तिसरे पर्व दणक्यात सुरु झाले आहे.हा शो आता रंगात आला आहे. या घरातुन स्पर्धक म्हणून आलेली कीर्तनकार शिवलीला पाटील प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे घरातून बाहेर पडली आहे. त्या मुळे 15 पैकी एक स्पर्धक कमी झाला आहे. त्यामुळे या घरात वाईल्ड कार्ड एंट्री द्वारे एका नवीन पाहुण्याची एंट्री होणार असे वृत्त समजले आहे.

हे इतर स्पर्धकांसाठी आश्चर्य कारक असणार हे त्यांच्या साठी आव्हाहनात्मक ठरणार .शनिवारी बिगबॉसच्या 'बिग बॉस चावडी ' या स्पेशल भागात  वाईल्ड कार्डाने एंट्री करणारा हा नवा पाहुणा कोण असेल याची जिज्ञासा सर्वांना आहेच. तर आम्ही सांगत आहोत की वाईल्ड कार्डाने एंट्री घेणारा हा पाहुणा आहे अभिनेता आदिश वैद्य. आदिश यांनी रात्रीस खेळ चाले 1 , कुंकू टिकली आणि टेटू,जिंदगी नॉट आउट, सारख्या शो मध्ये काम केले आहे आणि काही वेबसिरीज मध्ये ही काम केले आहे. त्याला हिंदीच्या एका मालिकेत काम करण्याची संधी मिळाली होती. परंतु त्याने मराठी बिगबॉस मध्ये भाग घेण्यासाठी ही मालिका सोडल्याचे सांगितले जात आहे. सध्या बिग बॉस मराठी च्या घरात विशाल निकम, उत्कर्ष शिंदे, संतोष चौधरी, विकास पाटील, अविष्कार दारव्हेकर, मीरा जगन्नाथ, मीनल शाह, तृप्ती देसाई, गायत्री दातार, स्नेहा वाघ, जय दुधाणे, सुरेखा कुडची, सोनाली पाटील, अक्षय वाघमारे हे स्पर्धक आहे. आणि हे सर्व स्पर्धक चुरशीने खेळत आहे.आता या मध्ये आदिश सहभागी होणार म्हटले तर खेळ अजूनच रंगणार.