1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 डिसेंबर 2020 (09:19 IST)

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या

President of Yashashwini Women’s Brigade Rekha Jare patil murdered
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील जतेगाव येथील घाटात अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात जखमी झालेल्या रेखा जरे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेखा जरे आपल्या कारने अहमदनगरला येत होत्या त्यावेळी हायवेवर शिरुरजवळ दुचाकीने त्यांच्या कारला धडक दिली आणि वाद झाला. यादरम्यान दुचाकीवर स्वार हल्लेखोराने धारदार शस्त्राने रेखा जरे यांच्यावर हल्ला केला आणि तेथून पळ काढला. रेखा जरे याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या होत्या.