आयजेपीएल टी-20 प्रकरणी गंभीरला नोटीस
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने फलंदाज गौतम गंभीर याला कायदेशीर नोटीस पाठवून एका टी-20 लीगमधून माघार घेण्याचे आदेश दिले आहेत. इंडियन ज्युनिअर प्रीमिअर लीग या टी-20 स्पर्धेचा गौतम गंभीर ब्रँड अॅम्बेसिडर आहे. पण या स्पर्धेचे नियमन बीसीसीआय अंतर्गत नसून दिल्ली स्थित दिनेश कपूर या व्यावसायिकाने ही स्पर्धा आयोजित केली आहे.
गंभीरने या स्पर्धेचे प्रमोशन करणारे ट्विट नुकतेच आपल्या ट्विटर हॅण्डलवर केल्यानंतर बीसीसीआयला या स्पर्धेची माहिती मिळाली. त्यानंतर बीसीसीआयने याची दखल घेत गंभीर याला कायदेशीर नोटीस पाठवून स्पर्धेतून माघार घेण्यास सांगितले.
आयजेपीएल स्पर्धेत द. आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी रोड्स, वेस्ट इंजिचला अष्टपैलू केरॉन पोलार्ड आणि भारतीय क्रिकेटपटू रिशी धवन हे या स्पर्धेत मेन्टॉर म्हणून कामगिरी वाजवत आहेत. बीसीसीआयची नोटीस आल्यानंतर गंभीर याने या स्पर्धेतून सर्वप्रकारे माघारी घेतली असल्याची माहिती गंभीरच्या निकटवर्तियाने दिली.