1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : मंगळवार, 16 नोव्हेंबर 2021 (11:05 IST)

हार्दिक पांड्या अडचणीत, कस्टम विभागाने 5 कोटींची 2 घडल्याळी जप्त केल्या

मुंबई. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दुबईहून भारतात परतताना अडचणीत सापडला आहे. त्यांच्याकडून कस्टम विभागाने पाच कोटी रुपयांच्या दोन घडल्याळी जप्त केल्या आहेत.
 
मुंबई कस्टम विभागाच्या म्हणण्यानुसार, हार्दिककडे या घड्याळांचे बिल नव्हते आणि त्याने घड्याळ असल्याची  घोषणाही केली नव्हती. यानंतर सीमा शुल्क विभागाने मुंबई विमानतळावर हार्दिक पांड्याची 5 कोटीं रुपयांच्या  दोन घडल्याळी जप्त केल्या आहेत.

हार्दिकला महागड्या घड्याळांची खूप आवड आहे. त्याने काही महिन्यांपूर्वी Patek Philippe Nautilus Platinum 5711 घड्याळ खरेदी केले आहे, ज्याची किंमत 5 कोटींहून अधिक आहे.
 
हार्दिक पांड्या टी-20 विश्वचषकात सपशेल अपयशी ठरला. त्याने 5 सामन्यांच्या 3 डावात केवळ 69 धावा केल्या. खराब कामगिरीमुळे त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळालेले नाही.