मी विराट कोहलीच्या जागी पोहोचू इच्छितो
पाकिस्तानची नवी रनमशीन बाबर आझम याची इच्छा आहे की, तो क्रिकेटच्या मैदानावर विराट कोहलीच्या महानतेशी बरोबरी करू इच्छित आहे. तो स्वतःला विराटचा चाहता सांगतो. त्याने सांगितले की, त्याची मनीषा ही जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या फलंदाजाची बरोबरी करण्याची आहे.
कोहलीने अगोदरच खूप काही प्राप्त केले आहे. तो आपल्या देशात एक महान खेळाडू आहे. प्रामाणिकपणे
सांगायचे झाले तर माझी तुलना त्याच्याशी केली जाऊ शकत नाही. मात्र, मीही तो ज्या जागी आहे त्या ठिकाणी पोहोचू इच्छितो.