गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 5 डिसेंबर 2019 (12:26 IST)

कसोटी क्रमवारीत स्मिथला मागे सारत विराट पुन्हा अव्वल

Virat again tops the Test rankings
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत प्रथम क्रमांकाचे स्थान मिळविले आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा माजीकर्णधार स्टीव्ह स्मिथला मागे सारत हे स्थान पटकावले आहे.
 
विराटने बांगलादेशविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केली. या कामगिरीमुळेच त्याच्या क्रमवारीत सुधारणा झाली. आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत विराट कोहली 928 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर, स्टीव्ह स्मिथ 923 गुणांसह दुसर्‍या स्थानावर सरकला आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत स्मिथला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. याचा परिणाम त्याच्या रँकिंगवरही झाला. ब्रिस्बेन कसोटीत स्मिथने केवळ 4 धावा केल्या. तर, अ‍ॅडेलेड कसोटीत त्याने 36 धावा केल्या. त्याचवेळी कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या गुलाबी चेंडूच्या टेस्ट सामन्यात विराटने बांगलादेशविरूद्ध 136 शतके झळकावली. मात्र, मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्यात तो शून्यावर बाद झाला.
 
बॉल टॅम्परिंगुळे एक वर्षाच्या बंदीचा सामना करणार्‍या स्मिथने इंग्लंडविरुद्धच्या अ‍ॅशेस मलिकेत शानदार प्रदर्शन करत कसोटीत तो अव्वलस्थानी होता.