शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 3 डिसेंबर 2019 (15:29 IST)

धोनीमुळेच चेन्नई आयपीएलमध्ये यशस्वी : मांजरेकर

चेन्नईचा संघ आयपीएलच्या इतिहासातील यशस्वी संघापैकी एक मानला जातो. कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे नेतृत्व हेच चेन्नईच्या यशामागचे खरे कारण असल्याचे मत, माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनी व्यक्त केले. 
 
चेन्नईच्या संघात अनुभवी खेळाडूंचा भरणा असतो. सलामीला त्यांच्याकडे फाफ डू प्लेसिस आणि शेन वॉटसनचा पर्याय आहे. यानंतर मधल्या फळीत अंबाती रायुडू आणि सुरेश रैनासारखे खेळाडू आहेत. धोनीचे नेतृत्व हेच चेन्नई सुपर किंग्जच्या यशाचे खरे गमक आहे, असेही मांजरेकर म्हणाले.