IND vs AUS: T20 मालिकेपूर्वी भारताला मोठा झटका, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी कोरोना पॉझिटिव्ह
मंगळवारपासून (20 सप्टेंबर) ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी कोरोना पॉझिटिव्ह आढळला असून त्याला आगामी टी-20 मालिकेतून वगळण्यात आले आहे.रिपोर्टनुसार तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी तंदुरुस्त होईल.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, मोहम्मद शमी मंगळवारपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्याटी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे .त्याचवेळी, कोविडमधून बरा झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी T20 मालिकेसाठी त्याच्या उपलब्धतेबाबत निर्णय घेतला जाईल.दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे तीन T20 सामने 28 सप्टेंबर, 2 ऑक्टोबर आणि 4 ऑक्टोबर रोजी तिरुअनंतपुरम, गुवाहाटी आणि इंदूर येथे आहेत.
या दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाचा पहिला टी-२० सामना भारताविरुद्ध २० सप्टेंबर रोजी मोहाली येथे होणार आहे तर दुसरा सामना २३ सप्टेंबर रोजी नागपुरात होणार आहे.या दौऱ्यातील तिसरा आणि अंतिम सामना 25 सप्टेंबर रोजी हैदराबादमध्ये यजमानांशी होणार आहे.
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (डब्ल्यूके), दिनेश कार्तिक (डब्ल्यूके), हार्दिक पंड्या, आर.के.अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया संघ : अॅरॉन फिंच (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅश्टन अगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, केन रिचर्डसन, डॅनियन सॅम्स, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड एमआयएलएफ अॅडम झाम्पा