मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 12 मार्च 2023 (13:27 IST)

IND vs AUS: अहमदाबाद कसोटीत भारताची अडचण वाढली , श्रेयस अय्यरची दुखापतीची तक्रार

IND vs AUS Shreyas Iyer complains of injury
अहमदाबाद कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने पाठदुखीची तक्रार केली आहे. यामुळे सामन्याच्या चौथ्या दिवशी तो त्याच्या निश्चित क्रमानुसार फलंदाजीसाठी आला नाही. भारताची चौथी विकेट पडल्यानंतर श्रेयस अय्यरच्या जागी श्रीकर भरत सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच अय्यरने पाठदुखीची तक्रार केली होती. यानंतर त्याला स्कॅनसाठी नेण्यात आले. श्रेयस सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे.
 श्रेयस अय्यर हा फिरकीचा सर्वोत्कृष्ट खेळाडू असून त्याच्याकडे फिरकी खेळपट्ट्यांवरही झटपट धावा काढण्याची क्षमता आहे. अशा स्थितीत अय्यरची दुखापत हा भारतासाठी मोठा धक्का आहे, कारण या सामन्यात तो आतापर्यंत फलंदाजीत योगदान देऊ शकला नाही.
 
अशा स्थितीत नागपुरात झालेल्या सामन्यात त्याच्या जागी सूर्यकुमार यादवला संधी देण्यात आली. या सामन्यात भारतीय संघाने एक डाव आणि132 धावांनी विजय मिळवला. मात्र, कसोटी कारकिर्दीतील पहिल्या डावात केवळ आठ धावा करून सूर्यकुमार यादव बाद झाला. मालिकेतील शेवटचा सामना अनिर्णित राहण्याच्या मार्गावर आहे. चौथ्या दिवसाचा खेळ सुरू असून भारतीय संघ पहिला डाव खेळत आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाचा पूर्ण डाव शिल्लक आहे. अशा परिस्थितीत हा सामना अनिर्णित राहण्याची शक्यता खूप जास्त आहे. 
 
 
Edited By - Priya Dixit