IND vs ENG:भारताने पाचवी कसोटी एक डाव आणि 64 धावानी जिंकली
रोहित आणि कंपनीने भारत आणि इंग्लंड यांच्यात धरमशाला येथे खेळलेली पाचवी कसोटी जिंकली. इंग्लंडने पहिल्या डावात 218 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव 477 धावांवर संपला आणि त्यांनी 259 धावांची आघाडी घेतली. यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ 195 धावांवर बाद झाला आणि सामना गमावला.भारताने पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत इंग्लंडचा एक डाव आणि 64 धावांनी पराभव केला आहे.
धर्मशाला येथे खेळलेला हा सामना अवघ्या तीन दिवसांत संपला. भारताचा पहिला डाव आज पहिल्या सत्रादरम्यान संपला. इंग्लंडने पहिल्या डावात 218 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव 477 धावांवर संपला. अशा प्रकारे टीम इंडियाला 259 धावांची आघाडी मिळाली. इंग्लंडचा दुसरा डाव 195 धावांत आटोपला आणि भारताने एक डाव आणि 64 धावांनी विजय मिळवला.
आज संपूर्ण इंग्लंड संघ दुसऱ्या डावात गडगडला. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांची मालिका 4-1 अशी जिंकली. शंभरावी कसोटी खेळणाऱ्या रविचंद्रन अश्विनची कामगिरी उत्कृष्ट होती. त्याने पहिल्या डावात चार आणि दुसऱ्या डावात पाच बळी घेतले. याशिवाय रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शतकी खेळी खेळली. पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा पराभव झाला होता, पण त्यानंतर रोहित आणि कंपनीने जबरदस्त पुनरागमन करत उर्वरित चार सामने जिंकले.
Edited by - Priya Dixit