सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 9 मार्च 2024 (09:46 IST)

IPL 2024 पूर्वी सनरायझर्स हैदराबादने लाँच केली नवीन जर्सी

sunrise jersey
Photo - Twitter
आयपीएल 2024 च्या अगदी आधी, सनरायझर्स हैदराबादने आगामी हंगामासाठी आपली नवीन जर्सी लॉन्च केली आहे.SRH ने स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमारसोबत त्यांची नवीन जर्सी दाखवली. 
 
यावेळची जर्सी SRH च्या शेवटच्या IPL जर्सीपेक्षा खूप वेगळी आहे. पण फ्रँचायझीसाठी हे नवीन नाही. वास्तविक, फ्रँचायझीने लाँच केलेली नवीन आयपीएल जर्सी त्याच्या SA20 जर्सीसारखीच आहे. वास्तविक, IPL च्या धर्तीवर दक्षिण आफ्रिकेत SA20 लीगचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये SRH चा सनरायझर्स इस्टर्न केप संघ देखील खेळतो

SRH ने सोशल मीडियावर नवीन जर्सीचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. या पोस्टमध्ये माजी संघाचा कर्णधार आणि भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार दिसत आहे.
 
जर्सीसोबत SRH ने आपला कॅप्टन देखील बदलला आहे. अलीकडेच फ्रेंचायझीने ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला आपल्या संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. मिनी लिलावात हैदराबादने कमिन्सला 20.50 कोटी रुपयांना विकत घेतले होते.
 
Edited By- Priya Dixit