गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 (09:18 IST)

IND vs ENG: टीम इंडिया दुसऱ्या सामन्यासाठी लंडनला पोहोचली, BCCI अध्यक्ष सौरव गांगुली लॉर्ड्स टेस्टमध्ये उपस्थित राहणार

भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पावसामुळे ड्रॉ झाला.लॉर्ड्सवर होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया लंडनला पोहोचली आहे. स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने लंडनला पोहोचल्यानंतर एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे.बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली मालिकेतील दुसरा कसोटी सामना पाहण्यासाठी लॉर्ड्सला पोहोचतील. पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव,जे इंग्लंड मध्ये बदली म्हणून आले होते,ते सध्या नॉटिंगहॅममध्ये राहतील आणि 13 ऑगस्टपर्यंत त्यांचा विलगीकरणाचा  कालावधी पूर्ण करतील. 
 
 स्थानिक वेळेनुसार, कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर भारतीय संघ सकाळी 11 वाजता लंडनला रवाना झाला होता. ऋद्धिमान साहा यांनीही त्याच्या ट्विटर अकाऊंटवर फोटो शेअर केला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना 12 ऑगस्टपासून खेळला जाणार आहे. सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ तिसऱ्या सामन्यातून निवडीसाठी उपलब्ध होतील आणि ते 13 तारखेला विलगीकरणाचा कालावधी संपल्यानंतर 14 पासून प्रशिक्षण सुरू करतील. इंग्लंडमध्ये 8 ऑगस्टपासून प्रवासाचे नियम बदलल्यामुळे सौरव गांगुली मंगळवारी लंडनला रवाना होणार आहे. इंग्लंड सरकारच्या नवीन नियमांनुसार, कोविड लसीचे दोन्ही डोस मिळालेल्या कोणत्याही व्यक्तीला वेगळे राहण्याची गरज नाही. म्हणजेच गांगुलीला कोणत्याही प्रकारचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करावा लागणार नाही. 
 
ट्रेंट ब्रिजवर खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला. पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी 157 धावांची गरज होती, पण दिवसभर सतत पडणाऱ्या पावसामुळे एकही चेंडू टाकता आला नाही. भारतासाठी गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने दोन्ही डावांमध्ये इंग्लिश गोलंदाजांना फटकेबाजी करत एकूण 9 बळी मिळवले होते. त्याचबरोबर फलंदाजी करताना केएल राहुलने पहिल्या डावात 84 धावांची खेळी खेळली. रवींद्र जडेजाने 56 धावांचे योगदान दिले.