भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला पण तो खेळाडू करतोय मजुरी
देशात असेही काही खेळाडू आहेत, ज्यांनी राष्ट्री य, आंतरराष्ट्री य स्त रावर भारताचा मान वाढवला. पण पुढे जाऊन सरकार, समाज सर्वांनाच त्याचा विसर पडल्याने त्यांच्यावर हलाखीची परिस्थिती आली आहे. असे खेळाडू मेहनत कष्ट करुन अगदी गरीबीचे जीवन जगत आहेत. अशीच एक दुखद कथा आहे भारताला वर्ल्ड कप जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या क्रिकेटपटूची जो सध्या मजदूरी करुन पोट भरत आहे.
अंतिम 11 मध्ये असणारा नरेश तुमदा
टीम इंडियानं 2018 साली पाकिस्तानला फायनलमध्ये पराभूत करत अंधांचा वर्ल्ड कप जिंकला होता त्या विजेतेपदावर भारतीय खेळाडूंची जोरदार प्रशंसा झाली होती. राष्ट्रपती पंतप्रधानांसह सर्वानीच या खेळाडूंचे कौतुक केल होतं. या वर्ल्ड कप विजेत्या टीममधील एका खेळाडूवर विकट परिस्थिती आढवली आहे. या खेळाडूला त्याचं घर चालवण्यासाठी मजुरी करावी लागत आहे. गुजरातमधील नवसारीमध्ये तो सध्या मजुरी करत आहे.
तर ही कथा आहे 2018 सालच्या अंध खेळाडूंच्या क्रिकेट विश्वचषकाची (2018 Blind Cricket World Cup) यावेळी भारतीय संघातील एक महत्वाचा खेळाडू होता नरेश तुमदा (Naresh Tumda). गुजरातच्या नवसारी (Gujarat Navsari) मधील नरेश तुमदा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघातील खेळाडू होता. दुबईत शारजाह येथे खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात त्याने पाकिस्तानच्या 308 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत भारताला विश्व चषक जिंकवून दिला होता.
गुजरातच्या मुख्यमंत्र्याकडे मदतीची मागणी, अद्यापही मदत नाही
नरेश तुमदा सध्या मजुरांप्रमाणे काम करुन स्वत:सह कुटुंबाच पोट भरत आहे. भारताला अंध व्यक्तींचा क्रिकेट विश्वचषक जिंकवून देणारा नरेश आज पोटाची खळगी भरण्यासाठी नवसारीत (Navsari) 250 रुपये रोंजदारीवर काम करत आहे. यावर बोलताना तो म्हणाला, “मी प्रतिदिवस 250 रुपये कमवतो. मी आतापर्यंत तीन वेळा गुजरातच्या मुख्यमंत्र्यांकडे मदतीसाठी गेलो आह. मला एखादी सरकारी नोकरी मिळेल का? अशी विनंती केली. पण अजूनपर्यंत मला कोणतंच सकारात्मक उत्तर आलेल नाही”