गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 जानेवारी 2023 (22:41 IST)

IND vs NZ: टीम इंडियाने रांचीत किवींसमोर गुडघे टेकले, 21 धावांनी पराभव

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना (Ind vs Nz 1st T20) झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशन (JSCA) स्टेडियमवर खेळला गेला. या मालिकेत टीम इंडियाची कमान हार्दिक पांड्या सांभाळत आहे, तर मिचेल सँटनरला या मालिकेसाठी न्यूझीलंडचा कर्णधार बनवण्यात आले आहे. या मालिकेपूर्वी दोन्ही संघांमध्ये 3 वनडे सामने खेळले गेले होते, ज्यामध्ये टीम इंडियाने 3-0 ने विजय मिळवला होता.
 
टीम इंडियाचा 21 धावांनी पराभव झाला
टीम इंडियाला पहिल्या T20 मध्ये 21 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या मॅचमध्ये टीम इंडियाला मॅच जिंकण्यासाठी 177 रन्सचं टार्गेट दिलं होतं, याला प्रत्युत्तर म्हणून टीम इंडियाला 20 ओव्हरमध्ये 9 गडी गमावून 155 रन्सच करता आल्या. टीम इंडियाकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक 50 धावा केल्या. त्याचवेळी सूर्यकुमार यादवने 47 धावांची खेळी केली.