Team India टीम इंडियाची फायनलमध्ये धडक
ND vs NZ U-19 Women's T20 World Cup Semifinal: महिला अंडर-19 T20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने न्यूझीलंडचा आठ गडी राखून पराभव केला. यासह टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली आहे. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने भारतासमोर 108 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारतीय संघाने दोन गडी गमावून हे साध्य केले आणि अंतिम फेरीत धडक मारली.
भारताने न्यूझीलंडचा पराभव केला
भारताने न्यूझीलंडचा आठ गडी राखून पराभव करत अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. येथे भारताचा सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील विजेत्याशी होईल. या सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर 108 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे टीम इंडियाने दोन गडी गमावून पूर्ण केले. भारताकडून पार्श्वी चोप्राने सर्वाधिक तीन बळी घेतले. त्याचवेळी उपकर्णधार श्वेता सेहरावतने नाबाद 61 धावा केल्या.