शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 4 ऑक्टोबर 2022 (17:43 IST)

IND vs SA 3rd T20: द. आफ्रिकेचा सामना करण्यासाठी उतरणार टीम इंडिया, कोहली-राहुलच्या जागी हे खेळाडू असणार

भारतीय क्रिकेट संघाने याआधीच दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन सामन्यांची T20I मालिका जिंकली आहे. टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली असून तिसरा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेला क्लीन स्वीप करायचा आहे.
 
16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या विश्वचषकापूर्वी अंतिम टी-20 सामन्यात भारतीय गोलंदाजांची खरी कसोटी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध असेल. संघाचे प्रमुख फलंदाज विराट कोहली आणि केएल राहुल यांना तिसऱ्या सामन्यातून विश्रांती दिली जाऊ शकते.
 
अशा स्थितीत कर्णधार रोहित शर्मासोबत रिभाष पंत किंवा सूर्यकुमार यादव डावाची सुरुवात करू शकतात. तिसरा टी-20 सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर होणार आहे. भारताने यापूर्वी 2017 आणि 2020 मध्ये इंदूरमध्ये श्रीलंकेविरुद्ध दोन टी-20 सामने खेळले आहेत आणि दोन्ही जिंकले आहेत.
 
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय संघ व्यवस्थापनाने त्यांचे आघाडीचे फलंदाज विराट कोहली आणि केएल राहुल यांना तिसऱ्या सामन्यासाठी विश्रांती दिली आहे. कोहलीच्या जागी श्रेयस अय्यरला संधी दिली जाऊ शकते. विश्वचषकासाठी भारतीय संघ 6 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. विराट आणि राहुल गुरुवारीच मुंबईत संघात सामील होतील. 
 
संघात राखीव फलंदाज नसल्यामुळे शाहबाज अहमदला संघात संधी मिळू शकते. मोहम्मद सिराज किंवा उमेश यादव यापैकी एका गोलंदाजाला घेतले जाऊ शकते.
 
संभाव्य प्लेइंग 11 -
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, दीपक चहर, आर अश्विन, अर्शदीप सिंग.
 
दक्षिण आफ्रिका: टेम्बा बावुमा (क), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रिले रुसो/रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे, लुंगी एनगिडी.
संघ पुढीलप्रमाणे आहेत
 
 भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (डब्ल्यूके), दिनेश कार्तिक (डब्ल्यूके), रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, दीपक चहर, उमेश यादव, श्रेयस अय्यर, शाहबाज अहमद आणि मोहम्मद सिराज.
 
दक्षिण आफ्रिका: टेम्बा बावुमा (क), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), बॉर्न फॉर्च्युन, रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, मार्को जॅन्सेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अॅनरिक नॉर्टजे, वेन पारनेल, अँडिले फेहलुकवायनेयूरीस प्रिटोरियस, कागिसो रबाडा, रिले रुसो, तबरेझ शम्सी आणि ट्रिस्टन स्टब्स.
 
Edited By- Priya Dixit