1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified सोमवार, 26 सप्टेंबर 2022 (21:13 IST)

IND vs SA: दीपक हुडा दुखापतीमुळे T20 मालिकेतून बाहेर

Deepak Hooda
भारतीय संघाला टी-20 विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटची मालिका खेळायची आहे.दीपक हुडा आता या मालिकेत खेळणार नाही कारण दुखापतीमुळे तो या मालिकेतून बाहेर पडला आहे.ESPNcricinfo ने वृत्त दिले आहे की पाठीच्या दुखापतीमुळे हुडा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेतून बाहेर पडला आहे.हुड्डाशिवाय मोहम्मद शमीही या मालिकेत खेळेल याची खात्री नाही.दरम्यान, श्रेयस अय्यर भारतीय संघात पुनरागमन करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. 
  
हुड्डा दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या T20I मालिकेत संघ निवडीसाठी उपलब्ध नव्हता तर शमीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या T20I साठी तिरुवनंतपुरमला प्रवास केलेला नाही.ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी शमीला कोरोना पॉझिटिव्ह आला होता आणि तो अजूनही पूर्ण  बरा झालेला नाही.अशा स्थितीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत शमी खेळेल याची खात्री नाही.मालिका सुरू होईपर्यंत शमी तंदुरुस्त नसेल तर त्याच्या जागी आणखी एका वेगवान गोलंदाज उमरान मलिकचा समावेश केला जाऊ शकतो.
 
शमीच्या जागी आलेल्या उमेश यादवने संघासह तिरुअनंतपुरमचा दौरा केला आहे आणि तो तीन सामन्यांच्या T20I मालिकेचाही भाग असेल अशी अपेक्षा आहे.शमी आता टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाऊ शकेल की नाही याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.