संबंधित माहिती
- Under-19 World Cup: आयसीसीने अंडर-19 वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर केले
- अक्षय कुमार बनला क्रिकेट संघाचा मालक
- IND W vs ENG W T20 : T20 मध्ये भारताचा इंग्लंडवर पाच गडी राखून विजय
- Anniversary: विरूष्काच्या लग्नाचा 6 वा वाढदिवस
- WPL 2024: फेब्रुवारीमध्ये महिला प्रीमियर लीगचे आयोजन होणार, बीसीसीआयचे सचिव जय शाह ने केली घोषणा
IND vs SA :दक्षिण आफ्रिकेला 15 षटकांत 152 धावांचे लक्ष्य
Ind vs SA T20 2023:भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी (12 डिसेंबर) खेळवला जात आहे. उभय संघांमधला हा सामना गकेबरहा येथील सेंट जॉर्ज पार्क येथे होत आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे खेळ थांबवण्यात आला तेव्हा भारताने 19.3 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात 180 धावा केल्या होत्या. यानंतर दक्षिण आफ्रिकेला 15 षटकांत 152 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
गेकेबराह येथे पाऊस थांबला असून दक्षिण आफ्रिकेला 15 षटकांत 152 धावांचे लक्ष्य देण्यात आले आहे. खेळ थांबला तेव्हा भारताने 19.3 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात 180 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेच्या डावातील पॉवरप्ले पाच षटकांचा असेल.
भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा डाव सुरू झाला आहे. मॅथ्यू ब्रिट्झके रीझा हेंड्रिक्ससोबत क्रीझवर आला आहे. मोहम्मद सिराजने भारताकडून गोलंदाजीची सुरुवात केली आहे.
ND vs SA : दोन्ही संघांचे प्लेइंग -11
भारत : यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.
दक्षिण आफ्रिका: मॅथ्यू ब्रिट्झके, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (सी), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, अँडिले फेहलुकवायो, जेराल्ड कोएत्झी, लिझाद विल्यम्स, तबरेझ शम्सी.
Edited by - Priya Dixit
