बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 13 मार्च 2022 (15:02 IST)

IND vs SL 2nd Test श्रीलंका संघ 109 धावांवर बाद, भारताची दुसरी खेळी सुरु

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस आहे. भारत विरुद्ध डे-नाईट कसोटीच्या दुसऱ्या दिवशी श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात 109 धावांत आटोपला. श्रीलंकेकडून अँजेलो मॅथ्यूजने 43 धावा केल्या. निरोशन डिकवेला 21 धावा करून बाद झाला. भारताकडून जसप्रीत बुमराहने 24 धावांत 5 तर मोहम्मद शमी आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी 2 बळी घेतले. टीम इंडियाच्या पहिल्या डावात श्रेयस अय्यरने 98 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 92 धावा केल्या. त्याच्याशिवाय विराट कोहलीने 23 आणि ऋषभ पंतने 39 धावा केल्या. टीम इंडियाने पहिल्या डावात 252 धावा केल्या होत्या. भारताने दुस-या डावात एकही विकेट न गमावता 31 धावा केल्या आहेत. भारताने 148 धावांची आघाडी घेतली आहे. रोहित आणि मयंक क्रीजवर आहेत. 
 
याआधी मोहाली येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारताने श्रीलंकेचा तीन दिवसांत एक डाव आणि 222 धावांनी पराभव केला होता.