गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 जुलै 2023 (19:37 IST)

IND vs WI : रोहित-यशस्वी जोडीने मोडला 21 वर्षांचा विक्रम, गावस्कर आणि सेहवागला मागे टाकले

वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताने आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात 150 धावांवर सर्वबाद झाला, त्याला प्रत्युत्तरात भारताने दोन गडी गमावून 312 धावा केल्या 
 
खेळाची सुरुवात करताना कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी शतके झळकावली. दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 229 धावांची भागीदारी केली. शतकी खेळीसह दोन्ही सलामीवीरांनी 21 वर्षे जुना विक्रम मोडला.
 
रोहित-यशस्वीने नंतर संजय बांगर आणि वीरेंद्र सेहवागच्या सर्वात मोठ्या सलामीच्या भागीदारीचा विक्रम मोडला. 2002 मध्ये, सेहवाग आणि बांगर यांनी डावाची सुरुवात करताना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 201 धावांची भागीदारी केली होती. दुसरीकडे, 13 जुलै 2023 रोजी म्हणजेच तब्बल 21 वर्षांनी रोहित आणि यशस्‍वीने मिळून हा विक्रम मोडला.  
 
10 चौकार आणि 2 षटकारांसह 103 धावा केल्या तर यशस्वीने 14 चौकारांच्या मदतीने नाबाद 143 धावा केल्या. या शतकी खेळीने दोन्ही सलामीवीरांनी अनेक विक्रम मोडीत काढले. रोहित-यशस्वी ही 2006 नंतर वेस्ट इंडिजच्या भूमीवर शतकी भागीदारी करणारी पहिली सलामी जोडी ठरली. कॅरेबियनमध्ये केवळ चार भारतीय सलामी जोडींनी शतकी भागीदारी केली आहे.
 
1971 साली सुनील गावस्कर आणि अशोक मांकड यांनी नाबाद 123 धावांची भागीदारी केली होती. गावस्करने कॅरेबियन मैदानावर अंशुमन गायकवाडसोबत शतकी भागीदारीही रचली. यानंतर वीरेंद्र सेहवाग आणि वसीम जाफर या सलामीच्या जोडीने 2006 साली मिळून 159 धावा केल्या होत्या. रोहित आणि यशस्वीने 229 धावांची भागीदारी करून सेहवाग-जाफरचा 17 वर्ष जुना विक्रम मोडला. यशस्वी जैस्वालने 61व्या षटकात जेसन होल्डरच्या चेंडूवर चौकार मारून नवा विक्रम केला आहे.
 




Edited by - Priya Dixit