शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 10 नोव्हेंबर 2022 (17:50 IST)

इंग्लंडकडून भारताचा धुव्वा; दिमाखात अंतिम फेरीत

england cricket
पराग फाटक
जोस बटलर आणि अलेक्स हेल्स या दोघांनी अविश्वनसीय फटकेबाजी करत भारतीय आक्रमणाचा सपशेल धुव्वा उडवत दिमाखात वर्ल्डकपची फायनल गाठली.
 
भारतीय संघाने दिलेलं 169रन्सचं आव्हान बटलर-हेल्स जोडीच्या फटकेबाजीसमोर एकदमच फिकं ठरलं. अंतिम लढतीत रविवारी पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात अंतिम मुकाबला होणार आहे.
 
संपूर्ण इनिंग्जदरम्यान हेल्स-बटलर जोडीने आक्रमणाची तीव्रता वाढवत नेली. भारतीय संघाची बॉलिंग आणि फिल्डिंग दोन्हीमध्ये ढिसाळपणा झाला. बटलरने 49 बॉलमध्ये 9 फोर आणि 3 सिक्ससह 80 रन्सची खेळी केली. हेल्सने 47 बॉलमध्ये 4 फोर आणि 7 सिक्ससह 86 रन्सची वादळी खेळी केली.
 
बटलर-हेल्स जोडीने पॉवरप्लेच्या 6 ओव्हर्समध्ये 63 धावा कुटल्या. भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, अक्षर पटेल या चौघांच्या बॉलिंगवर बटलर-हेल्स जोडीने वादळी आक्रमण केलं. चौकार-षटकारांची लयलूट करत विजयाच्यादृष्टीने पाया रचला.
 
अलेक्स हेल्सने अक्षर पटेलच्या बॉलिंगवर सिक्स लगावत अर्धशतक पूर्ण केलं. बटलर-हेल्स जोडीने मोठ्या फटक्यांच्या बरोबरीने धावूनही बऱ्याच रन्स काढल्या. बटलरने हार्दिकच्या पहिल्या ओव्हरमध्ये स्कूप केला. दोन रन्स निघणं अपेक्षित होते. फाईनलेगला मोहम्मद शमीने बॉल अडवला आणि थर्डमॅनच्या खेळाडूकडे बॉल फेकला. बॉल त्याच्या डोक्यावरून गेला आणि बटलर-हेल्स जोडीने 4 रन्स धावून काढल्या.
 
जोस बटलर आणि अलेक्स हेल्स या दोघांनी अविश्वनसीय फटकेबाजी करत भारतीय आक्रमणाचा खरपूस समाचार घेतला.
 
या दोघांनी पॉवरप्लेच्या 6 ओव्हर्समध्ये 63 धावा कुटल्या. भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, अक्षर पटेल या चौघांच्या बॉलिंगवर बटलर-हेल्स जोडीने वादळी आक्रमण केलं. चौकार-षटकारांची लयलूट करत विजयाच्यादृष्टीने पाया रचला. अलेक्स हेल्सने अक्षर पटेलच्या बॉलिंगवर सिक्स लगावत अर्धशतक पूर्ण केलं. बटलर-हेल्स जोडीने मोठ्या फटक्यांच्या बरोबरीने धावूनही बऱ्याच रन्स काढल्या. बटलरने हार्दिकच्या पहिल्या ओव्हरमध्ये स्कूप केला. दोन रन्स निघणं अपेक्षित होते. फाईनलेगला मोहम्मद शमीने बॉल अडवला आणि थर्डमॅनच्या खेळाडूकडे बॉल फेकला. बॉल त्याच्या डोक्यावरून गेला आणि बटलर-हेल्स जोडीने 4 रन्स धावून काढल्या.
 
हेल्सला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
 
 
हार्दिक पंड्याच्या वादळी खेळीच्या बळावर भारतीय संघाने इंग्लंडसमोर 169 रन्सचं आव्हान ठेवलं आहे.
 
17व्या ओव्हरपर्यंत भारतीय संघाची स्थिती 121/3 अशी होती पण शेवटच्या तीन ओव्हर्समध्ये भारतीयांनी 47 रन्स चोपून काढल्या. हार्दिकने 33 बॉलमध्ये 4 फोर आणि 5 सिक्ससह 63 धावांची झंझावाती खेळी केली.
 
इंग्लंडने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. हा निर्णय इंग्लंडचे बॉलर्स सार्थ ठरवणार अशी चिन्हं होती पण विराट कोहली आणि त्यानंतर हार्दिक पंड्या यांनी दिमाखदार खेळी करत भारतीय संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.
 
कर्णधार रोहित शर्मा आणि के.एल.राहुल मोठ्या खेळी करू शकले नाहीत. यंदाच्या स्पर्धेत जबरदस्त फॉर्मात असलेल्या सूर्यकुमार यादवला आदिल रशीदने फसवलं. त्याने 10 बॉलमध्ये 14 रन्स केल्या.
 
सूर्यकुमार आऊट झाल्यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पंड्या या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 40 बॉलमध्ये 61 रन्सची सुरेख भागीदारी रचत डावाला आकार दिला.
 
विराट कोहलीने 40 बॉलमध्ये 50 रन्सची खेळी केली. यामध्ये 4 फोर आणि सिक्सचा समावेश होता. कोहली आऊट झाल्यानंतर हार्दिकने झंझावाती पवित्रा स्वीकारात इंग्लंडच्या बॉलर्सवर आक्रमण केलं. 18व्या ओव्हरमध्ये हार्दिकने जॉर्डनला दोन सिक्स खेचले. 19व्या ओव्हरमध्ये 20 धावा कुटल्या. यामध्ये हार्दिकने एक सिक्स आणि दोन फोर लगावले.
 
इंग्लंडतर्फे जॉर्डनने 3 विकेट्स घेतल्या. बुधवारी झालेल्या सेमी फायनलच्या पहिल्या लढतीत पाकिस्तानने न्यूझीलंडला नमवत फायनलमध्ये धडक मारली आहे.
 
आक्रमक सुरुवातीनंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या सेमी फायनलच्या लढतीत आऊट झाला. रोहितने 27 रन्सची खेळी केली.
 
भारतीय संघाने 10 ओव्हर्समध्ये 62 रन्सची मजल मारली आहे. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव खेळत आहेत.
 
वर्ल्डकप सेमी फायनल लढतीत इंग्लंडने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. भारतीय संघाने लोकेश राहुलला गमावलं. ख्रिस वोक्सने राहुलला आऊट केलं. त्याने 5 रन्स केल्या.
 
राहुल आऊट झाल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला. सॅम करनला दोन फोर लगावत रोहितने मनसुबे स्पष्ट केले. कोहलीने लिव्हिंगस्टोनच्या बॉलिंगवर खणखणीत चौकार खेचला.
 
दुखापतीमुळे डेव्हिड मलान आणि मार्क वूड खेळत नाहीयेत. त्यांच्याऐवजी फिल सॉल्ट आणि ख्रिस जॉर्डन यांना संधी मिळाली आहे.
 
भारतीय संघाने झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यातील संघ कायम ठेवला आहे. दिनेश कार्तिकऐवजी ऋषभ पंतला प्राधान्य देण्यात आलं आहे. अक्षर पटेलऐवजी युझवेंद्र चहल किंवा हर्षल पटेल यांना संधी द्यावी अशी चर्चा होती पण संघव्यवस्थापनाने अक्षरवरच विश्वास कायम राखला आहे.
 
वर्ल्डकप फायनल प्रवेशापासून भारतीय संघ एक विजय दूर आहे. सेमी फायनलच्या लढतीत भारतासमोर इंग्लंडचं आव्हान आहे.
 
सेमी फायनलच्या पहिल्या लढतीत पाकिस्तानने न्यूझीलंडवर दणदणीत विजयासह फायनल गाठली आहे. भारताने इंग्लंडवर विजय मिळवल्यास अंतिम मुकाबल्यात भारत-पाकिस्तान संघ पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकू शकतात.
 
भारत आणि इंग्लंड ट्वेन्टी20 प्रकारात 22 वेळा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. भारतीय संघ 12-10 असा आघाडीवर आहे. ट्वेन्टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 3 सामन्यात भारतीय संघ 2-1 असा आघाडीवर आहे. तब्बल दशकभरानंतर ट्वेन्टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि इंग्लंड एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत.
 
विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव जबरदस्त फॉर्मात आहेत. काही महिन्यांपूर्वी फॉर्मसाठी झुंजणाऱ्या विराट कोहलीची बॅट आता तळपते आहे. पाकिस्तानविरुद्ध कोहलीच्या नाबाद 82 रन्सच्या बळावर भारतीय संघाने दिमाखदार विजय साकारला होता. कोहलीने नेदरलँड्सविरुद्धही अर्धशतक झळकावलं.
 
बांगलादेशविरुद्धही कोहलीने नाबाद 64 रन्सची खेळी साकारत संघाच्या विजयात योगदान दिलं होतं. इंग्लंडविरुद्ध कोहली भारतासाठी महत्त्वाचा आहे.
 
सूर्यकुमार यादव झंझावाती फॉर्ममध्ये आहे. मैदानात चौफेर फटकेबाजी करणाऱ्या सूर्यकुमारला रोखणं प्रतिस्पर्धी संघासाठी कठीण झालं आहे.
 
सूर्यकुमारने नेदरलँड्स, दक्षिण आफ्रिका आणि झिमाब्ब्वेविरुद्ध अर्धशतक साकारत भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली आहे.
 
सेमी फायनलच्या लढतीपूर्वी सराव सत्रादरम्यान कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाली होती. मात्र उपचारानंतर तो पुन्हा सरावासाठी परतला. के.एल.राहुलला लौकिकाला साजेसा खेळ करता न आल्याने जोरदार टीका झाली होती.
 
बांगलादेशविरुद्ध अर्धशतक करत राहुलने फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले. रोहित-राहुल-विराट-सूर्यकुमार या चौकडीकडून भारताला अपेक्षा आहेत.
 
कार्तिक की पंत?
अनुभवी दिनेश कार्तिक की युवा ऋषभ पंत यांच्यापैकी एकालाच अंतिम अकरात प्रवेश मिळू शकतो. गेल्या वर्षभरात भारतीय संघाने कार्तिककडे फिनिशर म्हणून जबाबदारी दिली आहे. कार्तिकने या जबाबदारीला न्याय दिला आहे. दुसरीकडे पंत केवळ एक सामना खेळला आहे.
 
ट्वेन्टी20 प्रकारात भारतासाठी खेळताना पंतची कामगिरी उल्लेखनीय नाही पण टेस्ट आणि वनडेत तसंच आयपीएलमध्ये पंतने आपल्या बॅटची ताकद दाखवली आहे. पंत मॅचविनर आहे, त्याला अंतिम अकरात खेळवा असा आग्रह अनेक माजी खेळाडूंनी केला आहे. दिनेश कार्तिककडे प्रचंड अनुभव आहे. सेमी फायनलच्या महत्त्वपूर्ण लढतीत कार्तिक का पंत हा कठीण निर्णय भारतीय संघाला घ्यावा लागेल.
 
हार्दिकची उपयुक्तता
बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही आघाड्यांवर हार्दिकने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. तीन फास्ट बॉलर्सच्या बरोबरीने हार्दिकने बॉलिंग करत आहे. हाणामारीच्या ओव्हर्समध्ये फटकेबाजीची बाजूही हार्दिकला हाताळायची आहे. रनआऊट, कॅचेसमध्येही त्याने पुरेपूर योगदान दिलं आहे. संघाचं संतुलन राखण्यादृष्टीनेही हार्दिक पंड्या अतिशय मोलाचा आहे.
 
फिरकी जोडीत बदल?
रवीचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल या जोडगोळीवर भारताने विश्वास कायम राखला आहे. पण अक्षर पटेलला पुरेशी बॉलिंग किंवा बॅटिंग मिळालेली नाही.
 
अक्षर पटेलऐवजी युझवेंद्र चहलला घ्यावं असं क्रिकेटतज्ज्ञ म्हणत आहेत. अश्विन चतुर बॉलर आहे. भल्याभल्या बॅट्समनला जाळ्यात अडकावणं ही त्याची खासियत आहे. पॉवरप्लेमध्येही अश्विन बॉलिंग करतो. अश्विन उत्तम बॅट्समनही असल्यामुळे संघाला फायदा होतो.
 
फास्ट बॉलिंग त्रिकुट
लहान वयात परिपक्वता दाखवत बॉलिंग करणारा अर्शदीप सिंग कर्णधारासाठी हुकूमी एक्का ठरला आहे. डावाच्या सुरुवातीला आणि हाणामारीच्या ओव्हर्समध्येही अर्शदीप शांत डोक्याने बॉलिंग करतो आहे. पॉवरप्लेमध्ये विकेट्स पटकावत आणि रन्स रोखत अर्शदीप विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो आहे.
 
इंग्लंडकडे आठव्या क्रमांकापर्यंत बॅटिंगची क्षमता असलेले खेळाडू आहेत. अर्शदीपसाठी इंग्लंड मोठं आव्हान असणार आहे. भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी या अनुभवी जोडगोळीकडून भारताला मोठ्या अपेक्षा आहेत. शमीकडे भेदक असा यॉर्कर आणि उसळता चेंडू आहे. भुवीची बॉल स्विंग करण्याची क्षमता कमाल आहे
 
स्पर्धेतला सगळ्यात संतुलित संघ असं इंग्लंडचं वर्णन केलं जातं. आठव्या क्रमांकापर्यंत बॅटिंग करणारे खेळाडू, सहा-सात बॉलिंगचे पर्याय आणि दर्जेदार फिल्डिंग यामुळे इंग्लंडला हरवणं तितकंसं सोपं नाही. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर ट्वेन्टी20 प्रकारातला अतिशय धोकादायक खेळाडू आहे. पण या स्पर्धेत बटलरला फॉर्म गवसलेला नाही. पण भारताविरुद्ध खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव बटलरकडे आहे. आयपीएल संघाचा भाग असल्याने बटलरकडे भारतीय खेळाडूंच्या बरोबरीने खेळण्याचा अनुभवही आहे. बटलरला सूर गवसणं भारतासाठी धोकादायक असू शकतं.
 
अलेक्स हेल्सचं पुनरागमन ही इंग्लंडसाठी आश्वासक बाब आहे. अवघ्या काही ओव्हर्समध्ये सामन्याचं चित्र पालटवण्याची क्षमता हेल्सकडे आहे. हेल्स ऑस्ट्रेलियातल्या बिग बॅश स्पर्धेत खेळतो. इथल्या मैदानांची त्याला चोख माहिती आहे. डेव्हिड मलान हा इंग्लंडचा भरवशाचा खेळाडू दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. मलानच्या ऐवजी फिल सॉल्टला संधी मिळण्याची शक्यता आहे. सॉल्ट आणि हॅरी ब्रूक हे दोघेही टोलेजंग फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहेत. मोईन अली, लायम लिव्हिंगस्टोन, बेन स्टोक्स हे अष्टपैलू त्रिकुट अतिशय धोकादायक आहे. बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही आघाड्यांवर सक्षम या तिघांना रोखणं भारताचं प्राधान्य असेल.
 
डावखुरा फास्ट बॉलर सॅम करन जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. फसवा स्लोअरवन, बॅट्समनला बुचकळ्यात टाकणारा उसळता चेंडू टाकण्यासाठी सॅम प्रसिद्ध आहे. भारताविरुद्ध सॅमची कामगिरी नेहमी चांगली होते. मार्क वूड भन्नाट वेगाने बॉलिंग करतो. शॉर्ट बॉल ही वूडची खासियत आहे.
 
दुखापतीमुळे वूड खेळण्याची शक्यता कमी झाली आहे. वूड खेळू न शकल्यास ख्रिस जॉर्डनचा संघात समावेश होईल. ख्रिस वोक्स टिच्चून बॉलिंग करतो. बॉलिंगच्या बरोबरीने बॅटिंगमध्येही त्याचं योगदान असतं. आदिल रशीदने स्पिनची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. रशीदविरुध सावधपणे खेळावं लागेल.
 
सेमी फायनलचे नियम
सेमी फायनलसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. 10 ओव्हर्सचाही खेळू होऊ शकला नाही तर मॅच राखीव दिवशी खेळवण्यात येईल. 10 ओव्हर्सपेक्षा जास्त खेळ झाला असेल तर डकवर्थ लुईस प्रणाली लागू होईल.
 
अडलेडची खेळपट्टी अडलेडची खेळपट्टी बॅटिंग आणि बॉलिंग दोन्हीसाठी चांगलं आहे. या खेळपट्टीवर भारताने बांगलादेशला नमवलं आहे.
 
भारतीय संघ-
 
रोहित शर्मा, के.एल.राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या,दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, दीपक हुड्डा, युझवेंद्र चहल, ऋषभ पंत, हर्षल पटेल.
 
इंग्लंड -
 
जोस बटलर, अलेक्स हेल्स, फिल सॉल्ट, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, मोईन अली, हॅरी ब्रूक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, लायन लिव्हिंगस्टोन, टायमल मिल्स, आदिल रशीद, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वूड.
 
युवराजची षटकार मैफल (19 सप्टेंबर 2007, डरबान)
 
ही मॅच गाजली युवराज सिंगच्या एका ओव्हरमध्ये सहा सिक्सेसनी. गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग यांनी 136 रन्सची दणदणीत सलामी दिली. या दोघांनी इंग्लंडच्या आक्रमणाचा खरपूस समाचार घेतला.
 
सेहवागने 52 बॉलमध्ये 4 फोर आणि 3 सिक्ससह 68 रन्सची तडाखेबंद खेळी केली. गंभीरने 41 बॉलमध्ये 7 फोर आणि एका सिक्ससह 58 रन्सची खेळी केली. रॉबिन उथप्पाला मोठी खेळी करण्यात अपयश आले. महेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंह ही जोडी एकत्र आली.
 
फ्लिनटॉफ आणि युवराज यांच्यामध्ये बाचाबाची झाली. अंपायर्सनी मध्यस्थी करत प्रकरण शांत केलं. या प्रकरणाने चिडलेल्या युवराजने स्टुअर्ट ब्रॉडच्या ओव्हरमध्ये सहा सिक्ससेची पखरण केली. युवराजच्या वादळी फटकेबाजीसमोर इंग्लंड निष्प्रभ ठरलं. युवराजने वेगवाने अर्धशतकाची नोंद केली. त्याने 14 बॉलमध्ये 3 फोर आणि 7 सिक्ससह 58 रन्सची अविश्सनीय खेळी केली. भारताने 218 रन्सचा डोंगर उभारला.
 
बॅटिंगसाठी अनुकूल खेळपट्यांवर इंग्लंडनेही जोरदार आक्रमण केलं. विक्रम सोळंकी (43), केव्हिन पीटरसन (39) यांच्यासह इंग्लंडच्या सर्वच बॅट्समननी हात चालवले. इंग्लंडने 200 रन्स केल्या पण अपेक्षित लक्ष्य गाठू शकले नाहीत. इरफान पठाणने 3 तर तर आरपी सिंहने 2 विकेट्स घेतल्या. युवराजला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.
 
फिनिशर धोनी अपयशी (14 जून 2009, लॉर्ड्स)
आव्हानात्मक खेळपट्टीवर इंग्लंडने 153 रन्सची मजल मारली. केव्हिन पीटरसनने 46 तर रवी बोपाराने 37 रन्सची खेळी केली. दिमित्री मस्करेन्हसने नाबाद 25 रन्स केल्या. भारताकडून हरभजन सिंगने 3 तर रवींद्र जडेजाने 2 विकेट्स घेतल्या.
 
भारताने 150 रन्स केल्या. युसुफ पठाणने 33 तर महेंद्रसिंग धोनीने 30 रन्स केल्या पण ते पुरेसं ठरलं नाही. रोहित शर्मा, सुरेश रैना, युवराज सिंग यांनी मोठी खेळी करण्यात अपयश आलं. 31 रन्स देत 2 विकेट्स घेणाऱ्या रायन साईडबॉटमला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.
 
हरभजनच्या फिरकीत अडकले इंग्रज (23 सप्टेंबर 2012, कोलंबो)
भारतीय संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना 170 रन्स केल्या. रोहित शर्माने 33 बॉलमध्ये 5 फोर आणि एका सिक्ससह 55 रन्सची खेळी केली. विराट कोहलीने 40 रन्स करत त्याला चांगली साथ दिली. सलामीवीर गौतम गंभीरने 38 बॉलमध्ये 45 रन्सची खणखणीत खेळी केली.
 
प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडचा डाव 80 रन्समध्येच गडगडला. सलामीवीर क्रेग किस्वेटरच्या 35 रन्सचा अपवाद वगळता कोणालाही मोठी खेळी करता आली नाही. हरभजनने 12 रन्सच्या मोबदल्यात 4 विकेट्स घेतल्या. इरफान पठाण आणि पीयुष चावला यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

Published By -Smita Joshi