गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : शुक्रवार, 9 मार्च 2018 (15:44 IST)

राहणे, रोहितसोबत शिकला पण भारताविरुद्ध खेळला हा भारतीय

- शराफत खान 
क्रिकेटचे जग हे फारच वेगळे आहे. कसे कसे रेकॉर्ड बनतात, मोडतात आणि कधी कधी असे समीकरण देखील बनतात जे तुम्हाला गोंधळात टाकतात. असाच एक भारतीय क्रिकेटर आहे, जो मुंबईत अजिंक्य राहणे आणि रोहित शर्मासोबत खेळला, पण जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उतरला तेव्हा भारतीय संघ त्याचा समोर होता आणि समोर होता रोहित शर्माच्या रूपात जुना जोडीदार.
बरेच खेळाडू या खेळात आपली प्रतिभा दाखवतात, पण सर्वांनाच उच्चतम दर्जेपर्यंत खेळण्याची संधी मिळेलच हे काही आवश्यक नाही. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेसोबत मुंबईच्या अंडर 19 संघात होता एक खेळाडू ज्याचे नाव आहे स्वप्नील पाटील. 
 
स्वप्निलाचे नाव मुंबई रणजी टीमच्या संभावितांच्या लिस्टमध्ये होते पण त्यात त्याची निवड झाली नाही. निरंतर निराशा हाती लागल्यामुळे त्याने आपल्या सिलेक्शनची उमेद सोडली होती, पण असे काही झाले की परदेशात जाऊन दुसर्‍या देशाच्या राष्ट्रीय संघात त्याची निवड झाली आणि तो दिवस ही आला जेव्हा तो भारताविरुद्ध खेळला. 
 
या वेळेस भारतीय संघात त्याचे जुने जोडीदार रोहित शर्मा आणि राहणे देखील होते. मुंबईचा स्वप्नील पाटील मुंबईसाठी अंडर-14 आणि 2005मध्ये अंडर-19 टीमसाठी खेळला होता. जेव्हा त्याला येथे संधी मिळाली नाही तेव्हा तो यूएई गेला, जेथे चार वर्ष कठोर मेहनत केली आणि तेथील राष्ट्रीय संघात आपली जागा बनवली. स्वप्नील विकेटकीपर फलंदाज आहे आणि त्याने आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात स्कॉटलँडच्या विरुद्ध नाबाद 99 धावांचा डाव खेळला होता. 
 
जेव्हा स्वपनिलची मुंबई रणजी टीममध्ये निवड झाली नाही तेव्हा त्याला समजलेकी दुबईच्या योगी ग्रुपला घरगुती क्रिकेटसाठी एका विकेटकीपर फलंदाजाची गरज आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमाने या ग्रुपवर काही खेळाडूंचे व्हिडिओ फुटेज पाठवण्यात आले, ज्यात स्वप्निलची निवड करण्यात आली. येथे येऊन स्वपनिलने फार मेहनत केली आणि आपली प्रतिभा साबीत केली.
 
स्वप्नील भारतीय संघाविरुद्ध खेळला आहे आणि या सामन्यात राहणे आणि रोहित सारखे जुने जोडीदार देखील सामील होते. वर्ल्ड कप 2015 मध्ये 28 फेब्रुवारी 2015ला पर्थमध्ये भारत आणि यूएईच्या दरम्यान स्वप्नील खेळला, ज्यात त्याने फक्त सात धावा काढल्या. रोहिताने या सामन्यात नाबाद अर्धशतक लावले होते, म्हणून यष्टिरक्षक बनून स्वप्निलाने आपल्या जुन्या जोडीदारांचा हा डाव फारच जळवून बघितला होता.