शनिवार, 10 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: दुबई , शनिवार, 3 ऑक्टोबर 2020 (14:29 IST)

भारतीय महिलांची तिसर्या स्थानावर झेप

Indian women
भारतीय महिला क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रमवारीत न्यूझीलंडला मागे टाकत तिसरे स्थान पटकावले आहे. आयसीसीने शुक्रवारी महिला क्रिकेट संघांसाठी नवी क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या संघाने आपले पहिले आणि दुसरे स्थान कायम राखले आहे. ऑस्ट्रेलियन महिला संघाच्या खात्यात 291 तर इंग्लंड महिला संघाच्या खात्यात 280 गुण जमा आहेत.
 
फेब्रुवारीत ऑस्ट्रेलियात झालेल महिला टी-20 विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणारा भारतीय महिला संघ 270 गुणांसह तिसर्या  स्थानी आहे. न्यूझीलंडचा संघ आणि भारताचा संघ यांच्यात फक्त एका गुणाचा फरक आहे. भारतीय महिला संघाच्या खेळाडू सध्या यूएईत महिला आयपीएल स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज झाल्या   आहेत. 4 ते 9 नोव्हेंबर या कालावधीत बीसीसीआय यूएईत 3 संघांमध्ये ही स्पर्धा खेळवणार असल्याचे समजते.