गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 26 सप्टेंबर 2020 (08:47 IST)

पुण्यात आज पाणी पुरवठा बंद, या ठिकाणी नाही येणार पाणी

पुणे शहराच्या काही भागांतील पाणीपुरवठा आज अर्थात शनिवारी बंद ठेवण्यात येणार आहे. पर्वती, बंडगार्डन व नवीन लष्कर जलकेंद्र अखत्यारीतील पाइपलाइनच्या देखभाल-दुरुस्तीचे काम शनिवारी सकाळी 9 ते रात्री 9 दरम्यान हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारपासून (दि. 27) या सर्व भागातील पाणीपुरवठा पूर्ववत होईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
 
या भागात बंद राहणार पाणीपुरवठा
 
कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, केशवनगर, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी, हांडेवाडी रोड, फुरसुंगी, फातिमानगर, एनआयबीएम, घोरपडी, बीटी कवडे रोड, रामटेकडी, मीठानगर, वैदूवाडी, बिबवेवाडी संपूर्ण परिसर, मार्केट यार्ड, डायस प्लॉट, गुलटेकडी, सहकारनगर, भवानी पेठ, गंज पेठ, घोरपडी पेठ, मुकुंदनगर, सॅलिसबरी पार्क, महर्षीनगर, पद्मावती, इंदिरानगर, बालाजीनगर, तळजाई वसाहत, धनकवडी, खराडी, चंदननगर, हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, दत्तनगर, आंबेगाव पठार, कात्रज, कोंढवा बुद्रुक, शिवाजीनगर, कोथरूड, गोखलेनगर, शास्त्रीनगर, घोले रोड, आपटे रोड.