शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : गुरूवार, 17 सप्टेंबर 2020 (12:38 IST)

SBI च्या ग्राहकांना मोठा धक्का, आता एफडी वर मिळणार कमी व्याज

देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँक भारतीय स्टेट बँक (SBI) ने मुदत ठेवी वरील(FD) मिळणारे व्याज दर कमी केले आहेत. दोन कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवीचे नवे दर 10 सप्टेंबर 2020 पासून सुरू झाले आहे. एक ते दोन वर्षाच्या किरकोळ मुदत ठेवीवर आता 20 आधार अंकावर कमी व्याज मिळणार आहे. या पूर्वी 27 मे रोजी बँकेने FD वरच्या व्याजदर कमी केल्या होत्या.
 
दोन कोटींपेक्षा कमी एफडीवर आपल्याला किती व्याज मिळेल हे जाणून घ्या
अवधी सामान्य नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी
सात ते 45 दिवस  2.9 टक्के 3.4 टक्के
46 ते 179 दिवस             3.9 टक्के 4.4 टक्के
180 ते 210 दिवस 4.4 टक्के   4.9 टक्के 
211 पासून एक वर्ष 4.4 टक्के 4.9 टक्के 
एक वर्ष ते दोन वर्ष 4.9 टक्के  5.4 टक्के
दोन वर्षे ते तीन वर्ष 5.1 टक्के 5.6 टक्के
तीन वर्ष ते पाच वर्ष 5.3 टक्के   5.8 टक्के
पाच वर्षे ते 10 वर्ष
5.4 टक्के       
6.2 टक्के
SBI व्ही केयरच्या डिपॉझिट ची मुदत वाढविण्यात आली.
 
बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडी चे उत्पादन 'एसबीआय व्ही केयर डिपॉझिट' बाजार पेठेत आणले. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना पाच वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी 30 आधार अंकाचे अतिरिक्त प्रीमियर किरकोळ मुदत ठेवीवर मिळतो. आता एसबीआय व्ही केयर डिपॉझिट योजना 31 डिसेंबर 2020 पर्यंत सुरू असणार. या पूर्वी या योजनेची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2020 होती. याचा फायदा आता ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे.
 
ग्राहकांना क्रेडिट कार्ड देय साठी मुदत मिळेल -
मोरेटोरियम नंतर क्रेडिट कार्ड देय न देणाऱ्यांना एसबीआय अजून मुदत देऊ शकतं. एसबीआय कार्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की कर्ज पुनर्गठन योजना देखील त्या ग्राहकांना समाविष्ट करू शकते, ज्यांना मोरॅटोरियम नंतर देखील पैसे भरता आले नाही. 
 
ग्राहकांना कर्ज पुनर्गठन योजनेत सामील होता येईल - 
आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मार्च ते मे पर्यंत देय न देणाऱ्या ग्राहकांचे खात्यांना मानक ठेवले आहे. या नंतर मोरॅटोरियम तीन महिने वाढवून ऑगस्ट पर्यंत करण्यात आले, परंतु ग्राहकांना ही सुविधा मिळण्यासाठी निवडणूक करण्याचा पर्याय दिला. काही ग्राहकांनी मोरॅटोरियम ची निवड केली तर बऱ्याचशा ग्राहकांनी देय देण्यास सुरू केले. तर काही ग्राहकांनी मोरॅटोरियम ची निवड केली नाही किंवा पैसे देखील भरले नाही.
4.9 टक्के

4.9 टक्के