मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 24 जून 2020 (11:58 IST)

1 जुलैपासून बदलणार बँक खात्याशी संबधित हे नियम, आपणही जाणून घ्या

येत्या 1 जुलैपासून विविध बँकांचे काही महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. ज्याविषयी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. 
 
पीएनबी बँकेचे बचत खात्यावरील व्याजदर कमी होणार
पंजाब नॅशनल बँकेने बचत खात्यावरील मिळणाऱ्या व्याजदरामध्ये 0.50 टक्क्यांची कपात केली आहे. 1 जुलैपासून PNBच्या बचत खातेधारकांना वार्षिक केवळ 3.25 टक्के व्याज मिळेल. पीएनबीच्या बचत खात्यामधअये 50 लाख रुपयांपर्यंतचा बॅलन्स असल्यास वार्षिक 3 टक्के तर 50 लाखापेक्षा जास्त बॅलन्स असल्यास 3.25 टक्के व्याज मिळते.
 
ATM मधून पैसे काढण्याचा नियम
1 जुलैपासून एटीएममधून पैसे काढणे महाग होणार आहे. कोरोना काळात नागरिकांवर आर्थिक भार येऊ नये म्हणून अर्थ मंत्रालयाने एटीएममधून पैसे काढण्याठी सर्व ट्रान्झॅक्शन शूल्क हटवण्यात आले होते. तीन महिन्यांसाठी ही सूट देण्यात आली होती आणि त्याप्रमाणे सूट 30 जून 2020 रोजी संपत आहे.
 
तसेच कोरोना काळात खात्यामध्ये निश्चित कमीतकमी बॅलन्स ठेवणे अनिवार्य नसल्याचे सांगण्यात आले होते. हा निर्णय देखील तीन महिन्यांसाठी लागू असल्याने आता 1 जुलैपासून नियमात बदल येणार.