SBI ATM मधून पैसे काढण्याचे नियम 18 सप्टेंबर पासून बदलतील

Last Modified बुधवार, 16 सप्टेंबर 2020 (14:28 IST)
कोरोना काळात फसवणुकीचे अनेक प्रकरण समोर आले आहेत. भारतीय रिझर्व बँक (आरबीआय) चे ठोस नियम असूनही फसवणूक केली जात आहे. हे लक्षात घेत भारतीय स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांना दिलासा दिला आहे. एसबीआयने सुरक्षित बँकिंग उपलब्ध करून देण्यासाठी नवीन एटीएम सर्व्हिस सुरू केली आहे.

एसबीआयने वन टाइम पासवर्ड (OTP) आधारित एटीएम कॅश विड्रॉल सुविधेला 24 तास अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे. 18 सप्टेंबर पासून हा नियमाची
देशभरात अंमलबजावणी करण्यात येत आहे. वर्तमान काळात ही सुविधा रात्री आठ ते सकाळी आठ वाजेपर्यंत उपलब्ध आहे.

बँकेत ग्राहकांकडून देण्यात आलेल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी पाठवण्यात येईल, ज्याद्वारे पैसे काढता येतील. अर्थात 18 सप्टेंबर पासून एसबीआयच्या एटीएमहून 10,000 रुपये किंवा याहून अधिक राशी काढल्यास दिवसाला देखील ओटीपीची गरज पडेल.
1 जानेवारी 2020 पासून एसबीआयने एटीएममधून पैसे काढण्यासाठी ओटीपी अनिवार्य केलं होतं. एसबीआयने म्हटले आहे की ग्राहकांनी बँकेत आपला मोबाइल नंबर अपडेट करावा.

या प्रकारे काढता येतील पैसे
प्रक्रियेप्रमाणे आपण पैसे काढत असाल तेव्हा एटीएम स्क्रीनवर रकमेसह ओटीपी स्क्रीन देखील दिसून येईल. ग्राहकांना ओटीपी त्यांच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर पाठवण्यात येईल. याने फसवणुकीची शक्यता कमी होईल. हे लक्षात ठेवा की ओटीपी आधारित रोख रक्कम काढण्याची सुविधा केवळ एसबीआय एटीएमवर उपलब्ध आहे. इतर बँकांच्या एटीएममध्ये ही कार्यक्षमता नॅशनल फाइनेंशियल स्विच (NFS) मध्ये विकसित केलेली नाही.


यावर अधिक वाचा :

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...

भयंकर : आईनेच ४१ तासांपूर्वी जन्मलेल्या मुलीचा गळा आवळला

भयंकर : आईनेच ४१ तासांपूर्वी जन्मलेल्या मुलीचा गळा आवळला
सांगलीतील सिव्हिल रुग्णालयामध्ये जन्मदात्या आईनेच ४१ तासांपूर्वी जन्मलेल्या गोंडस मुलीचा ...

हॉटेल, बारसाठी किमान रात्री साडेअकरापर्यंतची वेळ वाढवून

हॉटेल, बारसाठी किमान रात्री साडेअकरापर्यंतची वेळ वाढवून द्या
रात्रीच्या वेळेतच हॉटेल, रेस्टॉरंटचा निम्म्याहून अधिक व्यवसाय होतो. मद्यालयामध्ये (परमिट ...

धीर सोडू नका प्रशासन तुमच्यासोबत खंबीर पणे उभे आहे : ...

धीर सोडू नका प्रशासन तुमच्यासोबत खंबीर पणे उभे आहे : मुख्यमंत्री
राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी ...

शरद पवारः महाराष्ट्रानं कर्ज घेऊन शेतकऱ्यांना संकटातून ...

शरद पवारः महाराष्ट्रानं कर्ज घेऊन शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढावं
उस्मानाबाद, लातूर, पंढरपूर, इंदापुरात अतिवृष्टीमुळे सर्वात जास्त नुकसान झाल्याचं ...

उद्धव ठाकरेः ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करणार ...

उद्धव ठाकरेः ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करणार का?
माझ्या बहिणीची 5 एकर पेरूची बाग जागेवर आडवी झाली, इतका पाऊस पडलाय. बागेतली सगळी झाडं ...