बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 14 सप्टेंबर 2020 (10:53 IST)

स्टेट बँकेने ठेवीवरील व्याजदर कमी केले

देशातील सर्वांत मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणार्याक स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना पुन्हा एकदा झटका दिला आहे. फिक्स डिपॉझिटवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एसबीआय ग्राहकांना मोठा फटका बसला आहे.
 
एसबीआयने रिटेल डोमेस्टिक टर्म डिपॉझिटवरील व्याज 1-2 वर्षाच्या कालावधीसाठी 0.2 टक्क्यांनी कमी केले आहे. त्यामुळे फिक्स डिपॉझिटवरील मिळणारा ग्राहकांना फायदा कमी झाला आहे.
 
10 सप्टेंबर 2020 पासून हे नवीन व्याजदर लागू केले आहे. यापूर्वी एसबीआयने 27 मे रोजी फिक्स डिपॉझिटवरील व्याजदरात कपात केली होती.