शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 27 ऑगस्ट 2020 (15:52 IST)

व्याज दरात आणखी कपात केली जाऊ शकते : दास

येत्या काळात व्याज दरात आणखी कपात केली जाऊ शकते, असे संकेत रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आले. अर्थव्यवस्थेला पुन्हा बळकट करून मार्गावर आणण्यासाठी सावधानता बाळगून पुढे जावे लागणार असल्याचे मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केले आहे.
 
अर्थव्यवस्थेला पुन्हा बळकट करत मार्गावर आणण्यासाठी दक्षताही बाळगणे तितकच महत्त्वाचे आहे. बँकांना सद्यस्थितीत आव्हानांचा सामना करावा लागेल हे स्पष्ट आहे. परंतु बँका या आव्हांनांना कसा प्रतिसाद आणि तोंड देतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. देशातील करोना महामारीचा प्रकोप आणि त्याच्या अन्य बाबींवर स्पष्टता आल्यानंतर रिझर्व्ह बँक महागाई आणि आर्थिक वद्धीबाबत आपला अंदाज वर्तवणार आहे. कर्ज देण्यात गरजेपेक्षा अधिक सतर्कता बाळगण्याने बँकांनाच अधिक नुकसान होणार आहे आणि मूलभूत कामं न केल्याने बँकाच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होईल. जोखीम पत्करण्यापासून बचाव करण्याऐवजी बँकांनी आपल्या रिक्स मॅनेजमेंट आणि गव्हर्नंन्स फ्रेमवर्कला अधिक सक्षम केले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.