IPL 2018 : ख्रिस गेल म्हणे पंजाबकडून खेळत असल्यानं मी खूप खूश आहे
आयपीएलच्या अकराव्या मोसमात कोणत्याही संघाने बोली न लावलेल्या ख्रिस गेलला पंजाबच्या संघाने अवघ्या 2 कोटीत खरेदी केल्या नंतर आपल्याला क्रिकेटच्या या प्रकाराचे राजे का संबोधले जाते याचा उत्तम नमुना गेलने या सत्रात खेळलेल्या सामन्यांमधून दाखवून दिला आहे. यासंदर्भात एका दैनिकाच्या प्रतीप्रतिनिधी सोबत बोलताना गेलने सांगीतले की, सध्या पंजाबकडून खेळत असल्यानं खूप खूश आहे. या संघातून खेळणं नशिबात होतं कारण मी या खेळाचा किंग आहे.
ख्रिस गेल सध्या जबरदस्त फार्मात आहे. आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यांमध्ये त्यानं 151 च्या सरासरीनं 252 धावा कुटल्या आहेत. त्यात एका नाबाद शतकाचा समावेश आहे. आयपीएलसाठी झालेल्या लिलावात सुरुवातीला गेलला कोणत्याच संघानं खरेदी केलं नाही. बेंगळुरू संघानं त्याला रिटेन ही केलं नाही. त्याच्या 2017 या वर्षीच्या कामगीरी मुळे त्याच्या वर या सत्रात कोणत्याही संघ मालकाने विश्वास दाखवला नव्हता. त्यामुळं त्याला लिलावात खरेदी करण्याची कुणीही ‘रिस्क’घेतली नाही. याचं गेलला आश्चर्य वाटलं. मात्र, नंतर त्याला किंग्ज इलेव्हन पंजाबनं 2 कोटी रुपयांना खरेदी केलं.