मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 एप्रिल 2018 (10:14 IST)

ख्रिस गेलन केलं यंदाच्या मोसमातलं पहिलं शतक

मोहालीतल्या आयपीएल सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबनं सनरायझर्स हैदराबादवर 15 धावांनी मात केली. पंजाबचा हा चार सामन्यांमधला तिसरा विजय ठरला. किंग्स इलेव्हन पंजाबचा सलामीवीर ख्रिस गेल या विजयाचा हिरो ठरला. त्याने 63 चेंडूत 104 धावा ठोकत, आयपीएलच्या यंदाच्या मोसमातलं पहिलं शतक नावावर केलं. त्यानं सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेऊन, 58 चेंडूंत शतक साजरं केलं. या सामन्यात गेलनं अवघ्या 63 चेंडूंत एक चौकार आणि अकरा षटकारांसह नाबाद 104 धावांची खेळी उभारली. गेलचं हे आयपीएलमधलं आजवरचं सहावं शतक ठरलं. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सहा शतकांचा विक्रम त्याच्याच नावावर आहे. 

या सामन्यात पंजाबनं हैदराबादला विजयासाठी 194 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला 20 षटकांत चार बाद 178 धावांचीच मजल मारता आली.

सनरायझर्सचा कर्णधार केन विल्यम्सन आणि मनीष पांडे यांनी वैयक्तिक अर्धशतकं झळकावून विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण त्यांचे प्रयत्न अखेर अयशस्वी ठरले. पंजाबकडून मोहित शर्मा आणि अँड्र्यू टायनं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं.