मंगळवार, 17 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 19 डिसेंबर 2023 (08:42 IST)

IPL 2024 Auction: प्रथमच देशाबाहेर खेळाडूंचा लिलाव होणार कधी कुठे होणार जाणून घ्या

IPL 2024 Auction:यंदा मिनी लिलावात एकूण 333 खेळाडूंचे भवितव्य ठरणार आहे. 10 संघात एकूण 77 जागा भरायच्या आहेत. त्यापैकी 30 स्लॉट विदेशी खेळाडूंसाठी आहेत. एका संघात जास्तीत जास्त 25 खेळाडू आणि किमान 18 खेळाडू असू शकतात, त्यामुळे फ्रँचायझी त्यांच्या सोयीनुसार खेळाडूंची निवड करतील. लिलावात सहभागी होणाऱ्या 333 खेळाडूंपैकी एकूण 214 भारतीय आणि 119 विदेशी खेळाडू असतील ज्यात दोन सहयोगी देशांच्या खेळाडूंचा समावेश आहे. 333 खेळाडूंपैकी 116 कॅप्ड खेळाडू आणि 215 अनकॅप्ड खेळाडू आहेत, त्यापैकी दोन सहयोगी राष्ट्रांचे आहेत.
 
आयपीएलचा लिलाव दुबईतील कोका कोला एरिना येथे होणार आहे. आयपीएलचा लिलाव भारताबाहेर होण्याची ही पहिलीच वेळ आहे.PL लिलाव मंगळवार, 19 डिसेंबर रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता सुरू होईल.मल्लिका सागर दुबई येथे होणाऱ्या IPL 2024 च्या लिलावासाठी लिलाव करणार आहे.दक्षिण आफ्रिकेची 17 वर्षीय क्वेना माफाका ही IPL 2024 च्या लिलावासाठी निवडण्यात आलेली सर्वात तरुण क्रिकेटपटू आहे. अफगाणिस्तानचा 38 वर्षीय मोहम्मद नबी हा IPL 2024 च्या लिलावात निवडलेला सर्वात वयस्कर खेळाडू आहे.
 
कोणत्या संघाच्या पर्समध्ये किती पैसे आहेत?
चेन्नई सुपर किंग्ज: 31.4 कोटी रुपये
दिल्ली कॅपिटल्स: रु 28.95 कोटी
गुजरात टायटन्स: रु. 38.15 कोटी
कोलकाता नाईट रायडर्स: रु. 32.7 कोटी
लखनौ सुपरजायंट्स: 13.15 कोटी रुपये
मुंबई इंडियन्स: रु. 17.75 कोटी
पंजाब किंग्स :29.1 कोटी रुपये
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: 23.25 कोटी रुपये
राजस्थान रॉयल्स: 14.5 कोटी रुपये
सनरायझर्स हैदराबाद : 34 कोटी रुपये
 
Edited By- Priya DIxit