मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 13 फेब्रुवारी 2021 (16:25 IST)

श्रीसंतला घेणयास आयपीएल संघांनी दाखविली अनास्था

आयपीएल 2021 च्या हंगामासाठी 18 फेब्रुवारीला लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी विविध देशांचे आंतरराष्ट्रीय व स्थानिक खेळाडूंनी या लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यातून 18 फेब्रुवारीच्या लिलावासाठी 292 खेळाडूंच्या नावांची अंतिम यादी निश्चित करण्यात आली आहे. या यादीत ग्लेन मॅक्सवेल, स्टिव्ह स्मिथ यांच्याबरोबरच अर्जुन तेंडुलकर याच्या बोलीवरही सार्यांचे विशेष लक्ष असणार आहे. पण तब्बल 8 वर्षांनी आयपीएलमध्ये पुनरागमन करण्यास उत्सुक असणार्यार श्रीसंतला मात्र संधी नाकारण्या आली आहे.
 
लिलावासाठी श्रीसंतने नाव नोंदवले होते. या लिलावासाठी 1 हजारांहून अधिक खेळाडूंनी नाव नोंदणी केली होती. पण सारेच खेळाडू लिलावाच्या मैदानात उतरवणे शक्य नसल्याने नियमानुसार, सर्व खेळाडूंच्या नोंदणीची यादी प्रत्येक संघाला दिली गेली आणि त्यातून एखाद्या संघाने एखाद्या खेळाडूला विकत घेण्यात रस दाखवला तरच त्या खेळाडूला अंतिम लिलावात संधी मिळते.
 
श्रीसंतच्या बाबतीत कोणीही रस न दाखवल्याने त्याला अंतिम यादीत यंदा तरी स्थान मिळवता आले नाही. दरम्यान अंतिम  यादीत नाव न मिळाल्याने श्रीसंतला दुःख झाले आहे. त्याने व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. अंतिम यादीत स्थान न मिळणे हे खूपच वेदनादायी आहे. पण या प्रकाराने मी अजिबात खचलेलो नाही. जर क्रिकेटच्या मैदानातील पुनरागमनासाठी 8 वर्षे वाट पाहू शकतो तर आयपीएलसाठी अजून थोडा काळ नक्कीच वाट पाहू शकतो. मला कोणाच्याही सहानुभूतीची गरज नाही. कारण मी पूर्णपणे तंदुरूस्त आणि मानसिकदृष्ट्या उत्तम आहे, अशा शब्दात श्रीसंतने भावना व्यक्त केल्या.