सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

Ishan Kishan ईशान किशनची हेअरस्टाईल चर्चेत

Ishan Kishan new hairstyle
Ishan Kishan new hairstyle भारताचा सलामीवीर ईशान किशनसाठी वेस्ट इंडिज दौरा छान होता. त्याने सलग चार अर्धशतके झळकावली होती. दुसरीकडे ऋषभ पंतच्या दुखापतीमुळे ईशानला आशिया चषक आणि विश्वचषक 2023 मध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून प्रबळ दावेदार मानले जात आहे. भारतीय संघ आणि चाहत्यांनाही त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. 

दरम्यान ईशान किशन त्याच्या नव्या लूकमुळे चर्चेत आहे. ईशान किशनची नवीन हेअरस्टाईल व्हायरल होत आहे. 
 
आशिया चषकापूर्वी ईशान किशनचा नवा हेअर स्टायलिश लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. काही चाहते त्याची तुलना भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीशी करत आहेत. त्यामुळे काही जण त्याला त्याच्या नव्या लूकसाठी ट्रोल करत आहेत.
 
सलामीवीर ईशान किशनने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्याच्या नवीन लूकचा फोटो शेअर केला आहे. कॅप्टन हार्दिक पंड्याने त्याच्या पोस्टवर कॉमेंट बॉक्समध्ये फायर इमोजी शेअर केला आहे.