1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
  4. Kohli from undiscovered planet

कोहली दुसर्‍या ग्रहावरचा व्यक्ती- गावस्कर

मुंबई- भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या दमदार फॉर्मात आहे. विराट प्रत्येकवेळी मैदानात मोठ्या जबाबदारीने फलंदाजीला उतरतो आणि चाहत्यांच्या अपेक्षादेखील वेळोवेळी पूर्ण करतो.
 
वानखेडेवर सुरू असलेल्या इंग्लंडाविरुद्धच्या कसोटीत देखील कोहलीने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत द्विशतकी खेळीनंतर माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार सुनील गावस्कर यांनी त्याचे तोंडभरून कौतुक केले.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना गावस्कर यांनी कोहली हा दुसर्‍या ग्रहावरचा व्यक्ती असल्याचे म्हटले. सूर्यमालिकेत अद्याप ज्या ग्रहाचा शोध लागलेला नाही अशा दुसर्‍याच ग्रहावरचा विराट कोहली आहे. संघाचा कर्णधार म्हणून तो खूप नवखा असला तरी तो जबाबदारीने फलंदाजी करतो. एक कर्णधार म्हणून त्याला येत्या काळात खूप शिकायला मिळेल आणि त्याच्या कामगिरीचा आलेख चढता राहील, असे गावस्कर म्हणाले.
पुढील लेख
वर्दाह चक्रीवादळाचा धोका, तमिलनाडु आणि आंध्रप्रदेशात, अलर्ट जारी