शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 4 जून 2025 (14:25 IST)

आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात कृणाल पांड्याने खास विक्रम रचला

IPL
आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव करून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 17 वर्षांनंतर पहिले विजेतेपद पटकावले. आरसीबीने संपूर्ण हंगामात शानदार खेळ केला आणि ट्रॉफी जिंकली.
अंतिम सामन्यात, कृणाल पंड्याने त्याच्या 4 षटकांच्या स्पेलमध्ये 17धावा देत दोन विकेट घेतल्या. त्याने जोस इंग्लिस आणि प्रभसिमरन सारख्या धोकादायक खेळाडूंना बाद केले. या शानदार कामगिरीसाठी त्याने सामनावीराचा पुरस्कार जिंकला. हा पुरस्कार जिंकून, कृणाल पंड्याने एक नवा इतिहास रचला आहे.
आयपीएलच्या इतिहासात दोन अंतिम सामन्यांमध्ये सामनावीराचा पुरस्कार जिंकणारा पंड्या पहिला खेळाडू बनला आहे. यापूर्वी, त्याने 2017 च्या आयपीएल अंतिम सामन्यातही पीओटीएम पुरस्कार जिंकला होता. 
आयपीएल 2025 मध्ये कृणाल पंड्याने या हंगामात 15 सामने खेळले. फलंदाजीत, त्याने 15 सामन्यांपैकी 7 डावात 109 धावा केल्या, ज्यामध्ये त्याचा सर्वोच्च धावसंख्या 73 नाबाद होती. गोलंदाजीत, त्याने 15 सामन्यांमध्ये 22.29 च्या सरासरीने 17 बळी घेतले. या हंगामात त्याने अनेक सामन्यांमध्ये गोलंदाजीत महत्त्वाची भूमिका बजावली आणि संघाच्या विजयात योगदान दिले
Edited By - Priya Dixit