शुक्रवार, 26 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: कोलकाता , शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017 (10:59 IST)

IND Vs AUS : कुलदिप यादवची हॅट्रिक

kuldeep yadav
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजासमोर लोटांगण घातले आहे. तेहत्तीसावे षटक फेकणारा कुलदिप यादवने केवळ तीन चेंडूत या सामन्याचा रंग बदलून टाकला आहे. षटकाच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर त्याने ऑस्ट्रेलियाचे तीन गडी बाद करत हॅट्रिक केली आणि अख्खे मैदान त्याचासाठी उभे राहिले.