LSG vs PBKS : आयपीएल २०२६ चा ६८ वा सामना आज लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स मध्ये खेळला जाणार
आयपीएल २०२६ च्या ६८ व्या सामन्यात, लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स हे संघ आज एकाना क्रिकेट स्टेडियमवर एकमेकांसमोर उभे ठाकतील.
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल २०२६) १९ व्या हंगामाचा ६८ वा सामना आज म्हणजेच शनिवार, २३ मे रोजी, लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळला जाईल. लखनौचे नेतृत्व ऋषभ पंत करत आहे, तर पंजाबचे कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे आहे.
तसेच लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील आयपीएल २०२६ चा ६८ वा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७:३० वाजता सुरू होईल.
आजच्या सामन्यासाठी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्ज
लखनौ सुपर जायंट्स (संभाव्य): मिचेल मार्श, जोश इंग्लिस, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मोहसीन खान, मयंक यादव, आकाश सिंग, प्रिन्स यादव, दिग्वेश राठी.
इम्पॅक्ट प्लेयर - आयुष बडोनी.
पंजाब किंग्ज (संभाव्य): प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, शशांक सिंग, अजमतुल्ला उमरझाई, हरप्रीत ब्रार, लॉकी फर्ग्युसन, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल/विजयकुमार वैकश.
इम्पॅक्ट प्लेयर - सुर्यांश शेडगे.
Edited By- Dhanashri Naik

