मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017 (10:45 IST)

धोनीच्या नव्या इंनिंगला सुरुवात, शिकवणार क्रिकेट

mehendra singh dhoni

द महेंद्रसिंह धोनी क्रिकेट अकॅडमी या नावाने क्रिकेटच्या नव्या इंनिंगला धोनी सुरुवात करतोय. शनिवारी या अॅकॅडमीचे धोनी स्वत: उद्घाटन करणार आहे. येत्या रविवारी तो याच ठिकाणी नवोदीत क्रिकेटर्ससोबत एक विशेष चर्चा सत्रात सहभाग होणार आहे.  दुबईतील स्पिंगडेल्स स्कुल कॅम्पसच्या परिसरात क्रिकेट अकॅडमी सुरु होत आहे. यासाठी धोनीच्या कंपनीने दुबईतील पॅसिफिक वेंचर्स या कंपनीसोबत करार केलाय. या अकॅडमीच्या विस्ताराबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या देशात अकॅडमी सुरु करण्याबाबत विचार करत असल्याचे परवेझ यावेळी म्हणाले.

धोनी या संकल्पनेचा अधिक विस्तार करण्याचा विचार करत असल्याची चर्चा देखील क्रिकेट वर्तुळात रंगली होती. त्याचसोबत खुद्द धोनी या माध्यमातून नवोदितांना मार्गदर्शन करण्याचे कार्य हाती घेण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.