शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 जुलै 2019 (09:28 IST)

महेंद्र सिंग धोनी भाजपच्या वाटेवर लवकरच करणार प्रवेश

भारताचा स्टार खेळाडू, आपल्या देशाच्या क्रिकेट संघाचा कप्तान महेंद्र सिंग धोनी लवकरच सर्वाना धक्का देणार आहे. माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने भाजपात प्रवेश या आगोदर केला आहे. त्यामुळे आता इतर खेळाडूंनाही पक्षात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. तर महेंद्रसिंह धोनी लवकरच निवृत्ती घेऊन भाजपात येणार असल्याचा दावा माजी केंद्रीय मंत्री संजय पावसान यांनी केला आहे. याबाबत धोनीशी अनेकदा चर्चा झाली असल्याचंही त्यांनी एका हिंदी वृत्त वाहिनीला संगितले आहे. धोनीने अनेक वर्षांपासून देशाची सेवा केली असून, त्याने आता क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन समाज आणि देशसेवेसाठी राजकारणात यावं, असंही संजय पासवान पुढे म्हणाले आहेत. याबाबत धोनी सोबत चर्चा पूर्ण झाली असून तो सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. पक्षाच्या संपर्क फॉर समर्थन अभियानांतर्गत भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी धोनीची भेट घेतली होती.