बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मॅंचेस्टर , गुरूवार, 11 जुलै 2019 (10:40 IST)

भारताच्या पराभवाने सोशल मिडियावर मिम्सचा पाऊस

भारतीय संघाचे आव्हान उपान्त्यफेरीत संपुष्टात आल्यामुळे भारतीय संघाचे पाठिराखे निराश असले तरी पाकिस्तानचे समर्थक आनंदात असल्याचे ट्‌विटर या सोशल नेटवर्किंग साईटवर पडलेल्या मिम्सच्या पावसामुळे समजले. यावेळी भारतीय संघाचे आणि पाकिस्तानी संघाच्या पाठिराख्यांमध्ये एक मिम्सचे युद्धच सुरू झाल्याचे दिसून आले होते.
 
तत्पूर्वी, भारतीय संघाची अतिशय खराब सुरुवात झाली. सलामीवीर रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली हे अवघा 1 धाव काढून माघारी परतले. सोशल मीडियावर या सामन्याचीच जोरदार चर्चा झाली आणि मीम्स व्हायरल झाले. ज्यात टीम इंडियाला आता फक्त आजीची प्रार्थनाच वाचवू शकते, असा मीम एकाने शेअर केला. तर काहींनी भारताच्या विकेट्‌सवर मजेशीर मीम्स पोस्ट केले आहेत. तर एकाने चक्क आता मोदीच फलंदाजी करायला येत असल्याचे भन्नाट मीम शेअर केले.