संबंधित माहिती
- भाजपच्या राज्यात सात खून माफ, कोणी केली भाजपवर ही टीका वाचा
- पिंपरी चिंचवड येथे १० कर्मचारी वगळता सर्व पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आयुकांचा धडाकेबाज निर्णय
- अंधश्रद्धेचा कळस विवाहितेला उपाशी ठेवणे, मध्यरात्री दर्गा साफ करायला लावणे कासवाला आंघोळ
- अभिनेत्री दिपाली सय्यद उपोषणाला बसणार मात्र कारण काय
- सपकाळ नॉलेज हब संस्थेच्या हबमधील 4500 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य वाचणार
भाजप खासदार काढणार 150 किमी पदयात्रा
भाजपचे सर्वच खासदार त्यांच्या मतदार संघात 150 किलोमीटरची पदयात्रा करणार आहेत. 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधींची 150 जयंती साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपच्या खासदारांना मंगळवारी हे आदेश दिले आहेत.
पंतप्रधानांच्या निर्देशानुसार भाजप खासदार 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान पदयात्रा करणार आहेत. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदींनी बैठकीला संबोधित करताना खासदारांना हे निर्देश दिले आहेत.
जोशींनी सांगितल्याप्रमाणे, लोकसभा सदस्यांप्रमाणेच राज्यसभा सदस्यांना सुद्धा प्रत्येकी एक-एक मतदार संघ दिला जाणार आहे. त्यामध्ये राज्यसभा सदस्यांना महात्मा गांधी आणि स्वातंत्र्य लढ्यातील त्यांच्या संघर्षावर कार्यक्रम घ्यावे लागणार आहेत.