बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 11 जुलै 2019 (09:47 IST)

भाजपच्या राज्यात सात खून माफ, कोणी केली भाजपवर ही टीका वाचा

उत्तराखंडच्या खानपूर विधानसभेचे भाजप आमदार प्रणव सिंह चॅम्पियन यांचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला असून त्यात ते दारूच्या नशेत धुंद होऊन गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. त्यासोबत त्यांच्या हातात चार बंदुका आहेत. खरं तर चार बंदुका ठेवणे हा गुन्हा आहे आणि चार बंदुका कशा आल्या, याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. भाजपच्या राज्यात सात खून माफ असल्यामुळेच प्रणव सिंह यांना धाक नाही, असे नवाब मलिक यांनी सांगितले.
 
सत्तेचा दुरुपयोग भाजपतर्फे केला जातोय - कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसच्या बंडखोर आमदारांची मनधरणी करण्यासाठी बंगळुरूहून आलेले डीके शिवकुमार यांच्यासह काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा व नसीम खान यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावर तीव्र नाराजी दर्शवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ता नवाब मलिक यांनी ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, असे सांगितले. शिवाय सत्तेचा दुरुपयोग भाजपतर्फे केला जात आहे. कर्नाटकचे सरकार पाडण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहे आणि यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही भूमिका बजावत आहे, असे विधान नवाब मलिक यांनी केले.