आपण जेव्हा लाजतो तेव्हा मेंदूत नेमकं काय होतं?
आपण जेव्हा लाजतो तेव्हा आपली मज्जासंस्था उत्तेजित होऊन आपली 'लढा किंवा पळा' ही स्थिती होते. अॅड्रेनलाईन हे संप्रेरक स्रवते, हृदयाची धडधड वाढते आणि चेहऱ्यावरच्या रक्तवाहिन्या फुगतात.
लाजताना तुम्हाला दुसऱ्याच्या मताची जाणिव होते. ते मत तुम्हाला महत्त्वाचं वाटतं.
ही एकूणच स्वत:ची जाणिव करून देणारी भावना असते सर्वांसमोर लहानसे अपघात होतात तेव्हा सहसा लोक लाजतात.
जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या शर्टवर कॉफी सांडता तेव्हा तुम्ही लाजता. जे घडलं ते बरोबर नव्हतं हे दाखवून देता. लाजण्यातून खरंतर तुम्ही माफीचा सिग्नल देता.