संबंधित माहिती
- OMA vs NAM : नामिबियाने ओमानला सुपर ओव्हरमध्ये पराभूत केले
- विराट कोहलीला आईसीसी वनडे प्लेयर ऑफ द ईयर 2023 चा पुरस्कार जाहीर
- इंग्लंडच्या गोलंदाजावर तीन महिन्यांची बंदी, बेटिंग प्रकरणात दोषी
- IND vs BAN: विश्वचषकापूर्वी, भारताच्या गोलंदाजांनी बांगलादेशचा 62 धावांनी पराभव केला
- Dinesh Karthik Retirement: दिनेश कार्तिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली
मराठमोळ्या अष्टपैलू खेळाडू केदार जाधव ने क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली
social media
केदार जाधवने त्याच्या निवृत्तीबाबत आपल्या इंस्टाग्रामवर जी पोस्ट शेअर केली आहे ती टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीशी मिळतीजुळती आहे. धोनीने निवृत्तीच्या वेळीही अशीच एक नोट शेअर केली होती. केदारने त्याच्या कारकिर्दीतील काही छायाचित्रे देखील शेअर केली आहेत ज्यात किशोर कुमारचे गाणे बॅकग्राउंडमध्ये वाजत आहे. केदारने दुपारी तीनच्या सुमारास निवृत्ती जाहीर केली. यादरम्यान केदार जाधवने सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत.
केदारच्या कारकिर्दी बद्दल बोलायचे तर केदार जाधवने टीम इंडियासाठी 73 वनडे आणि 9 टी-20 सामने खेळले आहेत. केदारने 73 एकदिवसीय सामन्यांमध्ये फलंदाजी करताना 1389 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये त्याने 2 शतके आणि 6 अर्धशतके झळकावली. याशिवाय 9 टी-20 सामन्यात 122 धावा केल्या. ज्यात त्याने आपल्या बॅटने अर्धशतक झळकावले. केदारने आयपीएलचे 95सामनेही खेळले आहेत. केदारने आयपीएलमध्ये1208 धावा केल्या होत्या. आयपीएलमध्ये त्याने आपल्या बॅटने 4 अर्धशतकेही झळकावली.केदारने भावुक करणारी पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानत क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे.
Edited by - Priya Dixit
