1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: ब्रिस्बेन , मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018 (15:53 IST)

रोहितला रोखणे अवघड – मॅक्‍सवेल

maxwell
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहित शर्माचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. त्यातच रोहित शर्मा सध्या फॉर्ममध्ये आहे, त्याचा फॉर्मपहाता रोहितला रोखणे अवाघड काम आहे असे मत ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्‍सवेलने व्यक्त केले आहे.
 
ऑस्ट्रेलियात एका मुलाखतीत मॅक्‍सवेल बोलत होता. तो म्हणाला की रोहित शर्मा जेव्हा फलंदाजी करतो, त्यावेळी त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव दिसत नाही. तो अगदी सहज फलंदाजी करताना दिसतो. त्यामुळे तो जेंव्हा लईत असतो तेंव्हा त्याला रोखणे जगातील कोणत्याही गोलंदाजांसाठी अवघड काम आहे. असेही त्याने यावेळी सांगितले.
 
रोहितची चेंडू फटकावण्याची टायमींग हि खुप उत्तम आहे. त्यामुळे तो अधिक चांगला फलंदाज म्हणून उठून दिसतो. फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाज दोनही प्रकारच्या गोलंदाजांना तो उत्तम प्रकारे खेळून काढतो आणि तो स्वतःच्या मनानुसार फटकेबाजी करून शकतो, असेही तो यावेळी म्हणाला.