बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: लंडन , बुधवार, 9 मे 2018 (11:40 IST)

'त्या' फटक्याबद्दल पश्चाताप नाही

2007 साली ज्या फटक्यामुळे पाकिस्तान संघ सामना व विश्वचषक हरला त्या फटक्याबद्दल  पश्चाताप होत नाही, असे बेधडकपणे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मिसबाह उल हकने सांगितले. भारताने पहिला टी-20 विश्वचषक जिंकला. अंतिम सामन्यातील अंतिम चेंडूवर पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल हकने फाइन लेगला मारलेला स्कूपचा फटका श्रीशांतने टिपला. पाकिस्तानने विश्वचषक गमावला. काही दिवस वाईट वाटले; परंतु आयुष्यात पुढे जात राहणे ही गरज आहे असे तो म्हणाला.