सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

कैफला अफगाणिस्तानातून प्रशिक्षकपदासाठी ऑफर

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रशिक्षकपदासाठी माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफला गळ घातली आहे. भारताचे लालचंद राजपूत हे आतापर्यंत अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून काम बघत होते.

आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असली तरीही मोहम्मद कैफ हा स्थानिक रणजी सामन्यांमध्ये खेळतो. छत्तीसगड संघाचा प्रशिक्षक आणि कर्णधार अशी दुहेरी जबाबदारी सध्या मोहम्मद कैफकडे आहे. १३ कसोटी आणि १२५ वन-डे सामने खेळण्याचा मोहम्मद कैफला अनुभव आहे.